Governor controversy Esakal
महाराष्ट्र बातम्या

Governor controversy: शिवरायांचा पुन्हा एकेरी उल्लेख? राज्यपाल कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता!

राज्यात पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या व्यक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

राज्यात पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या व्यक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. अमोल मिटकरी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर संबंधित व्हिडीओ ट्विटदेखील केला आहे.

अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहतात की, “राज्यपाल महोदयांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख. नेमके राज्यपालांच्या मनात चाललंय तरी काय? आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करतील का?” असे प्रश्न अमोल मिटकरी यांनी व्हिडीओ ट्विट करत उपस्थित केले आहेत.

हे ही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

अमोल मिटकरी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राज्यपालांनी हिंदीत एक वक्तव्य केल्याचं दिसत आहे. “सब लोग कहते हैं की शिवाजी होने चाहीए, चंद्रशेखर होने चाहीए, भगतसिंह होने चाहीए, नेताजी होने चाहीए, लेकीन मेरे घरमें नही तो दुसरे के घरमे होने चाहीए”, असं राज्यपाल या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.

यासंबधी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, “राज्यपालांकडून वारंवार अशी वक्तव्ये करण्यामागील कारण काय हे जरा महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिलं पाहिजे ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची जबाबदारी आहे, असं मला वाटतं” असं मिटकरी म्हणलेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT