Maharashtra Politics : मंत्रिपदासाठी इच्छुक नाही, पण मंत्रिमंडळ विस्तार...; शिंदे गटातील आमदाराचं सूचक विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics

Maharashtra Politics : मंत्रिपदासाठी इच्छुक नाही, पण मंत्रिमंडळ विस्तार...; शिंदे गटातील आमदाराचं सूचक विधान

शिंदे-फडणवीस सरकारला काही दिवसात सहा महिने पूर्ण होत आहेत. या सहा महिन्यामध्ये एकदाच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होणार असल्याचे वारंवार सांगितले जाते. त्यामुळे आपल्याला मंत्रिपद मिळावं म्हणून अनेक प्रयत्न होत आहेत. पण मंत्रिमंडळाचा विस्तार काही झाला नाही. पण यावेळी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती काल समोर आली आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराची तारीखही ठरली असल्याचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे. तर मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून शिंदे गटाच्या आमदाराने घरचा आहेर शिंदे फडणवीस सरकारला दिला आहे.

हे ही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर स्पष्टपणे भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, आम्ही कुणीही मंत्रीपदासाठी इच्छुक नाही पण मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी इतका वेळ चांगला नाही. सहा महिने झाले आहेत, अनेक आमदार मंत्रीपदासाठी आस लावून बसलेले आहेत. आम्ही फडणवीस व शिंदे साहेबांना विनंती करतो की लवकर मंत्रिपदाचा विस्तार करावा असं शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हंटलं आहे.

हेही वाचा: ST Passengers : २५ लाख प्रवाशांची ‘एसटी’कडे पाठ

पुढे ते म्हणाले की, हो बच्चू कडू यांचं बरोबर आहे, अनेक जण मंत्रीपदासाठी उत्सुक आहेत, मंत्रिपदाचा विस्तार झाल्यास राज्यातील कामे जलद गतीने होतील लवकर मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आम्ही आग्रह करू, असे गायकवाड म्हणाले आहेत. तर संजय राऊत यांच स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही , हे दोन वर्षे काय 2024 नंतर 2029 पर्यंत आम्हीच सरकारमध्ये राहू आणि त्यानंतर ही आम्हीच राहू , एकनाथ शिंदे सुद्धा असतील, असा ठाम विश्वासही संजय गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: सोलापुरात ‘कल्याण’च्या मटक्यात लाखोंची उलाढाल? पोलिस कारवाईनंतरही बंद नाही जुगार