
Sharad Pawar : प्रकाश आंबेडकरांच्या महाविकास आघाडीतील समावेशावर शरद पवारांचा मोठं विधान म्हणाले...
वंचित बहुजन आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या युतीला राष्ट्रवादीचा विरोध असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. यामुळे ठाकरे गटाची आणि वंचितची युती होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपावर स्वत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रिपब्लिकन पक्षातील काही गटांना आम्ही सोबत घेणार आहोत. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. अंतिम निर्णय झालेला नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान पवार यांच्या प्रकाश आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीत येण्यासाठी विरोध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कोल्हापुरात आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. यावेळी बोलताना विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रित पावलं टाकावी हा आमचा प्रयत्न आहे. काही राजकीय पक्ष आहेत असं शरद पवार म्हणाले आहेत.
हे ही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....
रिपब्लिकन पक्षातील काही गटांचा आघाडीत समावेश करावा, अशी इच्छा आहे. आम्ही चर्चेच्या स्थितीत आहोत. अंतिम निर्णय घेतलेला नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही अनेक प्रश्नावर एकत्रित निर्णय घेतो. उद्याच्या निवडणुकीसाठीही एकत्रित भूमिका घ्यायला काही अडचण येणार नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.
हेही वाचा: आजारपण खोटं, CM पदासाठी उद्धव यांना आजारी पाडलं; रश्मी ठाकरेंवर मनसेची टीका