anil deshmukh
anil deshmukh  sakal
महाराष्ट्र

Anil Deshmukh : राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण ताकदीने विधानसभेच्या जागा लढवेल

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट संपूर्ण ताकदीने विदर्भासह महाराष्ट्रातील विधानसभेच्या जागा महाविकास आघाडीत लढवेल. जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा विधानसभा मतदारसंघ पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला असून या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा दावा कायम राहील, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी गोंदिया येथे बुधवारी ( ता. २२) आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

पत्रकार परिषदेला खासदार खुशाल बोपचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बजरंगसिंह परिहार, माजी आमदार दीनानाथ पडोळे, दिलीप पनकुले, रविकांत बोपचे, जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे, जिल्हा कार्याध्यक्ष मिथून मेश्राम उपस्थित होते.

अनिल देशमुख म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षापासून केवळ फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. सरकारचे सर्व लक्ष याच गोष्टींकडे आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार व जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे जनतेच्या मनात या सरकारप्रती प्रचंड आकस असून हा आकस २०२४ निवडणुकीत दिसून येईल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना धानाला प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर केला होता.

मात्र या सरकारने हेक्टरी बोनस जाहीर करुन शेतकऱ्यांची दिशाभूल केली. धानाला बोनस जाहीर करण्यासाठी हिवाळी अधिवेशनाची प्रतीक्षा न करता त्वरित हेक्टरी २५ हजार रुपये बोनस जाहीर करण्याची मागणी यावेळी केली. तसेच भाजपने आपल्यावर केलेले आरोप हे तथ्यहिन असल्याचे स्पष्ट झाले असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: शिवानी अग्रवालला उद्या कोर्टात हजर केले जाणार

IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

100 वर्ष जुनं पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्योगपती गेला खाजगी विमानाने; कोणतं आहे ते पुस्तक?

Chhaya Kadam : रेड कार्पेटवर 'ते' मराठी गाणं वाजलं अन् मी डान्स करायला सुरुवात केली; छाया कदम यांनी सांगितले 'कान'चे खास किस्से

Amravati Loksabha Election : अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

SCROLL FOR NEXT