Rajesh Tope  टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

पॅथोलॉजी लॅब नियंत्रणावर नविन कायदा आणणार - राजेश टोपे

राज्यात ८ हजार पॅथोलॉजी लॅब बोगस- मनिषा कायंदे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप -प्रत्यारोप झाले. त्यामुळे आजच्या अधिवेशनात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान बोगस सर्टीफिकिकेटचे प्रकार मुंबईतील पॅथोलॉजी लॅबमधून (Pathology Lab) समोर आल्याचे सदस्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. राज्यात सुमारे १३ हजार पॅथोलॉजी लॅबपैकी ८ हजार पॅथोलॉजी लॅब बोगस असल्याची माहिती मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी सांगितली. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope ) यांनी यासाठी नविन कायदा आणणार असल्याचे सांगितले आहे.

राज्यात सुमारे १३ हजार पॅथोलॉजी लॅबपैकी ८ हजार पॅथोलॉजी लॅब बोगस असल्याची माहिती मनिषा कायंदे यांनी सांगितली.

राज्यातील बोगस पॅथॉलॉजी लॅबच्या कारभारावर नियंत्रण आणण्यासाठी व सनियंत्रण ठेवण्यासाठी बाँम्बे नर्सींग होम अधिनियमात सुधारणा करुन नवीन कायदा आणणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत दिली. हा कायदा आणण्यासाठी 18 तज्ज्ञ सदस्यांची समिती नेमण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

लॅबमध्ये काम करणाऱ्यांची, मशीन हाताळणाऱ्यांची, प्रोसेस करणाऱ्यांची नोंदणी व्हायला हवी होती. तसेच एमडी पॅथोलजी यांच्या स्वाक्षरीने अहवाल दिले जाणे गरजेचे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संपूर्ण नियंत्रणासाठी तीन महिन्यात आढावा घेत संपूर्ण रेग्युलेटरी नियंत्रण आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आयुक्त, आरोग्य सेवा यांच्या अध्यक्षतेखाली या क्षेत्राशी निगडीत आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण विभाग, महाराष्ट्र वैद्यकीय परीषद, महाराष्ट्र पॅरामेडीकल परीषद, अन्न व औषध प्रशासन तसेच पॅथॉलॉजीस्ट / मायक्रोबायोलॉजिस्ट संघटना व तंत्रज्ञांच्या विविध अशासकीय संस्था अशा 18 तज्ज्ञ सदस्यांची समिती गठित करण्यात येणार असून, या समितीचा अहवाल तीन महिन्याच्या मिळेल. त्यांनतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT