Satyajeet Tambe 
महाराष्ट्र बातम्या

Satyajeet Tambe : नवा ट्विस्ट! कपिल पाटील यांचा सत्यजीत तांबेंना पाठिंबा; आता...

सकाळ डिजिटल टीम

नाशिक - नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील यांनी अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे सत्यजीत तांबे यांची ताकद वाढली आहे. तर शुभांगी पाटील यांचा मार्ग आणखी खडतर होणार आहे. (Satyajeet Tambe news in Marathi)

सत्यजीत तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे आणि कपिल पाटील यांच्यात बैठक झाल्यानंतर हा पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. या पाठिंब्यानंतर डॉ. तांबे यांनी त्यांचे आभार मानले.

डॉ. तांबे म्हणाले की, मी नाशिक पदवीधरमधून तीन निवडणुका लढवल्या. पहिल्यांदा मी अपक्ष उमेदवार होतो. मला सर्व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला. त्यामुळे शिक्षक बांधवांबाबत सदैव कृतज्ञतेची भावना आहे. शिक्षक भारतीचे अनेक पदाधिकारी कायम संपर्कात आहेत. त्याला कपिल पाटील साक्षीदार आहेत, असंही डॉ. तांबे यांनी म्हटलं.

सामान्य माणसाच्या शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य आहेत. त्यामुळे शिक्षकाला जे न्यायिक अधिकार आहे, ते मिळायलाच पाहिजे. जुनी पेन्शन योजना मिळायला हवी. इतर अनेक प्रश्न आहेत. हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, असंही तांबे यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Rare Earth Discovery : विदर्भाचं भाग्य उजळणार! 'वेकोलि'च्या खाणीत सापडला मौल्यवान खनिजांचा साठा; पाहा कोणत्या 6 खाणी आहेत या यादीत

Bank Holiday : आजपासून सलग 5 दिवस बँका राहणार बंद! तुमच्या शहरातील सुट्ट्या कधी ते पाहा

Latest Marathi News Live Update : होळीच्या पार्श्वभूमीवर 280 जण तडीपार; पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई

Kolhapur Airpot : कोल्हापूर-दिल्ली विमानसेवा एक एप्रिलपासून; वाढत्या प्रवासी संख्येमुळे विमानतळ विस्ताराला गती

दोन कुटुंबं, लग्नाचा गोंधळ आणि भरपूर धमाल ! ‘सुपर डुपर’चा टीझर चर्चेत

SCROLL FOR NEXT