'मी मुंबईत असेन…' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खास मराठीत ट्विट | PM Narendra Modi's Mumbai Visit | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi's Mumbai Visit

Narendra Modi : 'मी मुंबईत असेन…' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खास मराठीत ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील अनेक विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर काही विकास कामांचं लोकार्पणही करण्यात येणार आहे.

त्यानंतर मुंबईत बीकेसी मैदानावर मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. सभेमध्ये मोदी काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. (PM Narendra Modi's Mumbai Visit)

अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबद्दल मराठी मध्ये ट्विट करून मी मुंबईत असेन असं सांगितलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी खास मराठीत ट्विट केलं आहे. "मी मुंबईत असेन. 38,000 कोटी रु. खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे.

यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हे ही वाचा : भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या ट्विटला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी रिप्लाय देत मुंबईत स्वागत केलं आहे. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई नगरीत आपले मन:पूर्वक स्वागत आहे.

आपल्या शुभ हस्ते मुंबईतील विविध महत्त्वकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे असं म्हंटलं आहे. या माध्यमातून मुंबईचा नक्कीच कायापालट होणार आहे, हा विश्वास आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: Mumbai Metro : PM मोदींच्या मुंबई दौऱ्याचा सामान्यांना फटका; मेट्रोबाबत...

तर भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांसह शिंदे गटातील नेत्यांनीही त्यांचं मुंबईत स्वागत केलं आहे. आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर काही विकास कामांचं लोकार्पणही करण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबईत बीकेसी मैदानावर मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे

हेही वाचा: CM Eknath Shinde: BMCचा CM शिंदे सरकारला दणका! PM मोदींच्या दौऱ्याआधी केली मोठी कारवाई