Prashant Jagtap, Nitesh Rane
Prashant Jagtap, Nitesh Rane Esakal
महाराष्ट्र

दिल्लीला पळून जाण्याचं बळ कोंबडीच्या पंखात नसतं; राणेंवर टीकास्त्र

सकाळ डिजिटल टीम

सिंधुदुर्ग: शिवसैनिक संतोष परब वरील हल्ल्यात अटकेची टांगती तलवार असलेल्या आमदार नितेश राणे यांच्यावर विरोधकांनी टीकेचे झोड उठवण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीला पळून गेले. कसं शक्य आहे ? अशी उपरोधक टीका राष्ट्रवादीचे (NCP) पुणे शहराध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी राणेंचे नाव घेता केली आहे. सध्या सिंधुदुर्गात (Sindhudurg) जिल्हा बँक निवडणुकीमुळे पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना (Shivsena) असं वातावरण जिल्ह्यात तापू लागलेले आहे. संतोष परब यांच्या हल्ल्यासंदर्भात सहा संशयित आरोपी पकडल्याची माहिती साेमवारी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली. परंतु दाभाडेंनी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्याबाबत काहीच माहिती दिली नाही.

शिवसैनिक संतोष परब (Satntosh Parab) वरील हल्ल्यात अटकेची टांगती तलवार असलेल्या आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अॅड. राजेंद्र रावराणे (Rajendra Ravrane) यांच्या माध्यमातून धाव घेतली आहे. या अर्जाची सुनावणी मंगळवारी दुपारी होणार असून त्याची प्रतीक्षा राजकीय क्षेत्रांमध्ये आहे. नितेश राणे नेमके कुठे आहेत याबाबत संभ्रमावस्था आहे. राणे यांना शोधण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. मुंबई टू गोवा (Mumbai,Goa) नितेश हे नारायण राणे सोबत आले होते अशी ही बातमी आहे.

नितेश राणे गेले तीन दिवस कुठेच दिसत नसल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीकेचे सूड उठवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे (NCP) पुणे शहराध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी राणेंचे नाव घेता एक ट्विट केले आहे. ते म्हणतात, लोकांना वाटतंय ते दिल्लीला पळून गेले. कसं शक्य आहे ? कोंबडीच्या पंखात एवढं बळ नसतं. जगताप यांच्या ट्विटवर काहींनी प्रतिसाद देत थेट राणेंवर शाब्दिक हल्ला चढविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

SCROLL FOR NEXT