महाराष्ट्र

Loksabha 2019 : सभांच्या खर्चाबाबत राज ठाकरेंना नोटीस

सकाळवृत्तसेवा

मुंबई- लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार रिंगणात उतरलेला नसताना राज्यभर सभा घेणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आता सभांचा खर्च दाखवणे भाग पडणार आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे सभांच्या खर्चाचा तपशील मागवला आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्त दिलीप शिंदे यांनी गुरुवारी (ता. २) पत्रकारांना ही माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर राज यांनी प्रत्येक सभांमधून टीकेची झोड उठवली होती. एकही उमेदवार निवडणूक लढत नसताना राज यांनी सभा घेतल्या. त्यांच्या या सभांतून ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे वाक्‍य लोकप्रिय झाले. एकही उमेदवार निवडणूक लढत नसताना त्यांच्या या सभांचा खर्च कुणाच्या खात्यात दाखवणार, असे प्रश्‍न भाजपचे प्रवक्ते विनोद तावडे यांनी उपस्थित केले होते. आता निवडणूक आयोगाने राज यांच्याकडे खर्चाचा तपशील मागवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: संजू सॅमसनचे दमदार अर्धशतक, राजस्थानच्या १०० धावाही पार

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT