Students_MPSC 
महाराष्ट्र बातम्या

ब्लॅकलिस्टेड कंपन्याच करणार सरळसेवा भरती? नव्या वादाला फुटलं तोंड

ब्रिजमोहन पाटील

पुणे : राज्य शासनातील गट क आणि गट ड मधील सरळ सेवेची पदे भरण्यासाठी महाआटी विभागाने ज्या कंपन्यांची निवड केली आहे, त्यातील दोन कंपन्या यापूर्वी बॅकलिस्टेड करण्यात आलेल्या आहेत. तरीही याच संस्थांना काम दिले जाणार असेल, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ आहे, असा आरोप विद्यार्थी संघटनांकडून केला जात आहे.

सरळसेवा पदभरतीसाठी महाआयटी विभागाने निविदा प्रक्रियेत सहभाग घेतलेल्या 18 कंपन्यांच्या तांत्रिक व परीक्षेचा दर याची तपासणी करून चार कंपन्या फायनल केल्या आहेत. त्याचा प्रस्ताव दोन दिवसात शासनाकडे सादर केला आहे. या अपात्र आणि पात्र कंपन्यांची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, महाआयटी विभागातील अधिकाऱ्यांनी त्यास दुजोरा दिला आहे. यापूर्वी महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून भरती करताना त्यात घोटाळा झाला होता. आता पुन्हा ब्लॅक लिस्टेड कंपन्याच पात्र ठरत असल्याने ही निवड प्रक्रिया वादात सापडली आहे. याबाबत महाआयटी विभागाच्या व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 

"सरळसेवेची भरती पारदर्शक झाली पाहिजे पण ब्लॅकलिस्टेड कंपन्यांना पात्र ठरवले आहे. ज्या कंपनीने "यूपीएससी' परीक्षेचे काम केले, ती मात्र अपात्र ठरली आहे. हा एकप्रकारे राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांच्या भवितव्याशी खेळ आहे. महाआयटीने पात्र ठरवलेल्या चार पैकी एका कंपनीला उत्तरप्रदेश सरकारने मे 2019 मध्ये, तर दुसऱ्या कंपनीला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 1 जून 2020 ला ब्लॅकलिस्ट केले आहे. त्यामुळे ही निविदा रद्द करून थेट एमपीएससीमार्फतच भरती प्रक्रिया राबवावी.
- महेश बडे, प्रतिनिधी, एमपीएससी स्टुडंट्‌स राइट्‌स

'एमपीएससी'ने सरळसेवेची भरती करण्यास तयार असल्याबद्दल राज्य शासनाला पत्र दिले आहे. तरीही ही पदभरती खासगी कंपन्यांकडूनच केली जात आहे. त्यात आता ब्लॅकलिस्टेड खासगी कंपन्यांची निवड झाल्याने हे सरकार भ्रष्टाचाराला वाव देत आहे का अशी शंका निर्माण होत आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली पाहिजे.''
- राहुल कवठेकर, सदस्य, एमपीएससी समन्वय समिती

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

Latest Marathi News Live Update : पावसाने मुंबईकरांचे हाल, वेस्टर्न एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

'हेरा फेरी 3'ला मोठा धक्का? दिग्दर्शनाबाबत निर्मात्यांचा मोठा खुलासा

Fifa World Cup: किलियन एम्बापेचा जलवा... Golden Boot च्या शर्यतीत मेस्सीला मागे टाकले; फ्रान्स, नॉर्वे अन् मेक्सिको Round of 16 मध्ये

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT