अखेर थिएटर गजबजलं! 'एका लग्नाची पुढची गोष्ट' नाटकाचा प्रयोग हाऊसफुल्ल!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 December 2020

लॉकडाऊननंतर नाटक कधी सुरू होणार याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. चित्रपटगृह सुरू झाली पण आम्ही चित्रपट पाहिला नाही तर नाटक पाहिले.

वारजे माळवाडी (पुणे) : अनलॉकच्या प्रक्रिया सुरु झाल्यानंतरचा कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवारी (ता.१२) सायंकाळी नाटकाचा पहिला प्रयोग हाऊसफुल्ल झाला होता. ते नाटक होतं ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले आणि कविता लाड यांचे 'एका लग्नाची पुढची गोष्ट'.

मंचर नगरपंचायत तळ्यात-मळ्यात; इच्छुक उमेदवार व नागरिक संभ्रमात​

पहिल्यांदा प्रयोग होता, त्यामुळे या नोंदीमध्ये पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, अभिनेते मोहन जोशी, अभिनेते सतीश आळेकर, गायिका मधुरा दातार, गायिका बेला शेंडे, संगीतकार व गायक डॉ.सलील कुलकर्णी, निर्मात्या गौरी प्रशांत दामले, गायक ऋषिकेश रानडे, पुणे टॉकीजचे हेमंत गुजराथी, बांधकाम व्यवसायिक अमोल रावेतकर उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले, तर नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन समीर हम्पी यांनी केले होते.

भारतीयांना लसीबाबत मिळणार मोठा दिलासा! पुनावाला यांनी दिली महत्त्वाची माहिती

कोथरूड येथील आजचा प्रयोग हाऊसफुल्ल झाला होता. याच नाटकाचे उद्या बालगंधर्व आणि चिंचवड येथील प्रयोग देखील हाऊसफुल झालेले आहेत. 
आपल्या कुटुंबियांसह नाटक पाहण्यासाठी आलेले स्वप्नील हर्षे असे म्हणाले की, "लॉकडाऊननंतर नाटक कधी सुरू होणार याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. चित्रपटगृह सुरू झाली पण आम्ही चित्रपट पाहिला नाही तर नाटक पाहिले. रांगेत उभे राहून तिकीटे घेतली. आज नाट्यगृहात प्रवेश करताना मास्क असेल, तरच प्रवेश दिला जात होता. तापमानाची तपासणी केली. सभागृहात शेजारील एक खुर्ची रिकामी होती. या अशा पद्धतीने याठिकाणी सामाजिक आंतर पाळून आम्ही नाटक पाहिले. या नाटकाचा पहिला प्रयोग आम्ही कुटुंबीयांनी खूप आनंद घेतला."

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First show of Eka lagnachi Pudhachi Gosht play was housefull yesterday in Kothrud