pankaja -dhananjay munde
pankaja -dhananjay munde e sakal
महाराष्ट्र

आपलं मंत्रिपद भाड्यानं दिलंय, पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला

भाग्यश्री राऊत

बीड : जिल्ह्यातील सावरगाव येथे आज पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा (savargaon dasara melava beed 2021 ) आयोजित केला होता. भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP leader Pankaja munde) यांची तोफ कोणावर धडाडणार? याची सर्वजण प्रतिक्षा करत होते. शेवटी पंकजा मुंडे यांनी मंत्री धनंजय मुंडे (minister dhananjay munde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'आपलं मंत्रिपद भाड्याने दिलं' असा टोला पंकजा यांनी लगावला आहे.

मराठवाड्यात शेतीचे नुकसान झाले. बीड येथे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पण, अद्याप राज्य सरकारने पैसे दिले नाही. पालकमंत्र्यांचे पैसे अद्यापही पोहोचले नाही. काही म्हटलं तर यांना राग येतो. मी मंत्री होते त्यावेळी किती वेळा मला धमक्या देत होत्या. आता बीड जिल्ह्याची अवस्था काय आहे? यांनी आपलं मंत्रिपद भाड्यानं दिलं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात यांना काही बोलता येत नाही, असा टोला पंकजा मुंडेंनी लगावला.

महाराष्ट्रात काय चाललंय हे कोणालाच समजेना. या सरकारला महिलांच्या अत्याचाराविरोधात बोलायचं नाही. जी बायको तुमच्यासाठी व्रत वैकल्य करता तिची अवहेलना करतात. यावर बोलायला गेले की ताई कुठे होत्या? असं विचारतात, अशी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. तसेच येत्या १२ डिसेंबरला ऊसतोड कामगारांशी संवाद साधणार असल्याचे त्या म्हणाल्या.

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे जनतेसाठी काही चांगल्या घोषणा करतील अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या. विरोधी पक्षातील प्रत्येक नेता म्हणतो की, हे सरकार पडणार आणि सत्ताधारी म्हणतात सरकार मजबूत आहे. पण जनतेसाठी काय करता याच्यावर बोला. गुन्हेगारीविरोधात काय करता. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या भूमिका नीट पार पाडाव्यात असंही पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT