Pooja Chavan News 
महाराष्ट्र बातम्या

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण, ऑडिओ क्लिपमध्ये मंत्र्यांशी संवाद साधणारा तरुण गायब

प्रवीण फुटके

परळी वैजनाथ (जि.बीड) : पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमधील एका मंत्र्यांशी संवाद साधणारा अरुण राठोड याचे कुटुंबीय तालुक्यातील धारावती तांडा येथील राहत्या घरून गायब झाले आहेत. घराला कुलूप लावलेले असून ते आता नेमके कुठे आहेत, हे सांगता येत नाही.


येथील पुजा चव्हाण हिने पुणे येथे आत्महत्या केल्याच्या प्रकरणात दर दिवशी वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. रविवारी (ता.१४) अरुण राठोड याच्या तालुक्यातील धारावती तांड्यावरील घराला कुलूप लावले असल्याचे पाहायला मिळाले. पूजा चव्हाण हिची आत्महत्या की हत्या याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही. याशिवाय ज्या ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झालेल्या आहेत.

त्या क्लिपमध्ये अरुण राठोड याचा एका मंत्र्याशी संवाद असल्याचे बोलले जात आहे. असे असताना अरुण राठोड यांच्या कुटुंबियांना याबाबत काही माहिती नाही. असे असतानाही रविवारी अरुण राठोड यांच्या राहत्या घराला कुलूप असल्याचे पाहायला मिळाले. त्याचे कुटुंबीय नेमके आता कुठे आहे. हे धारावती तांडा येथील ग्रामस्थांना देखील माहिती नाही.


संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gary Kirsten : भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारा कोच, आता श्रीलंकेला प्रशिक्षण देणार; T20 World Cup नंतर बोर्डाचा निर्णय

ICC ने जाहीर केली 'टीम ऑफ द टूर्नामेंट', चार भारतीयांचा समावेश, विनिंग कॅप्टन सूर्याला मात्र स्थान नाही, मग कर्णधार कोण?

राज्य सरकारने नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना का दिली स्थगिती? परिवहनमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण...

Iran-Israel war: युद्धाचा भडका! इराणच्या विरोधात दोन तगडे देश मैदानात; आता माघार नाही...

Latest Marathi News Live Update: RTE प्रवेशांबाबत न्यायालयानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT