
जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांचा पराभव केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा पण माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.
औरंगाबाद : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावाई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी औरंगाबादेत आज रविवारी (ता.14) रावसाहेब दानवे यांनी सुभेदारी विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेतून बाहेर जातांना एका पत्रकाराने हर्षवर्धन जाधव यांनी दानवेंवर केलेल्या आरोपाविषयी विचारल्यानंतर रावसाहेब दानवे चांगलेच भडकले. 'तुम्ही जावायलाचा विचारा' असे सांगत यावर बोलणे टाळले.
जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांचा पराभव केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा पण माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. आतापर्यंत अनेक आरोप हर्षवर्धन यांनी केले होते. केंद्रीय राज्यमंत्री दानवे हर्षवर्धन जाधव यांच्यावर आतापर्यत कुठलेच स्टेटमेंट दिलेले नाही. हा विषयावर पत्रकार परिषद संपल्यानंतर एका पत्रकाराने विचारला. जावयाचे नाव ऐकताच दानवेंचा संताप अनावर झाला. रागाने 'या वक्तव्याबाबत जावयलाच विचारा असेही दानवे म्हणाले.
संपादन - गणेश पिटेकर