political esakal
महाराष्ट्र बातम्या

'संजय राऊत तुम्ही 'महाचमचा'; पंतप्रधानांची माफी मागावी'

'संजय राऊत यांनी चमचेगिरीची भाषा करणे म्हणजे जगातील सर्वात मोठा विनोद'

सकाळ डिजिटल टीम

'संजय राऊत यांनी चमचेगिरीची भाषा करणे म्हणजे जगातील सर्वात मोठा विनोद'

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज भाजपाचे चंद्रकांत पाटील यांच्या एका पंतप्रधान मोदींसंदर्भातील वक्तव्यावर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान मोदी 22 तास काम करतात. उरलेले दोन तास झोपही पंतप्रधानांना येऊ नये यावर संशोधन सुरू आहे.' चमच्यांचे हे विधान ऐकून पंतप्रधान मोदींची (PM Modi) दोन तासांची झोपही उडाली असेल!, असा टोमणा राऊत यांनी लगावला आहे. मालिक तो महान है, बस चमचों से परेशान हैं, असेही ते म्हणाले आहेत. दरम्यान, आता त्यांच्या या विधानानंतर भाजपाकडून तिखट प्रतिक्रिया येत आहेत. भाजपाचे प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी 'महाचमचा' संजय राऊत यांनी सबंध देशाची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

लाड यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. यात ते म्हणतात, खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदींसह, महात्मा गांधी आणि पंडित नेहरु यांचाही अपमान केला आहे. त्यामुळे देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान करणाऱ्या, 'महाचमचा' संजय राऊत यांनी सबंध देशाची माफी मागावी, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाले आहेत प्रसाद लाड

खासदार संजय राऊत यांनी चमचेगिरीची भाषा करणे म्हणजे जगातील सर्वात मोठा विनोद आहे. जगविख्यात चमचा म्हणून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) चमचेगिरी केली आहे. त्यामुळे राऊतांना असे बोलण्याचा काहीही अधिकार नाही. नरेंद्र मोदी किती तास काम करतात हे देश आणि जगाने मान्य केले आहे. परंतु तुमच्या व्यक्तीसाठी तुम्ही चमचेगिरी करता. पंतप्रधान किती वेळा आणि किती तास काम करतात हा संशोधनाचा विषय आहे. संजय राऊत तुम्ही महात्मा गांधींसह, नेहरुंनाही चमचे होते असे म्हणाला आहात. हा कॉंग्रेसचाच नव्हे तर देशाचा अपमान आहे. त्यामुळे तुम्ही महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana September Installment : लाडक्या बहिणींचा सप्टेंबरचा हप्ता कधी येणार? दिवाळीपूर्वी खात्यात 3,000 रुपये जमा होणार का? जाणून घ्या मोठी अपडेट

IND vs WI 5th T20I : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला पाचवा सामना होणार रद्द? चिंता वाढवणारे अपडेट्स, मालिका बरोबरीत सुटणार?

अजब प्रेमाची गजब कहाणी! प्रसिद्ध ३० वर्षीय इन्फ्लुएन्सर लग्नबंधनात अडकणार, थेट ७५ वर्षीय व्यक्तीसोबत साखरपुडा पार

Navratri Day Six: आज नवरात्रीची सहावी माळ! देवी कात्यायनीची पूजा कशी करावी? जाणून घ्या मंत्र, नैवेद्य आणि पौराणिक कथा

Supreme Court: सुनावणी सुरु असताना CJI सूर्यकांत यांच्यासमोरच न्यायालयात राडा! वकिलाचा मायक्रोफोन हिसकावला, चालू प्रकरणातून वकिलाची माघार

SCROLL FOR NEXT