Chandrakant Patil on Sanjay Raut
Chandrakant Patil on Sanjay Raut e sakal

मलिक तो महान, बस चमचों से..; राऊतांचा पाटलांना टोला

मोदी युगात चमच्यांची जागा अंधभक्तांनी घेतली, पण काम तेच आहे - राऊत
Summary

मोदी युगात चमच्यांची जागा अंधभक्तांनी घेतली, पण काम तेच आहे

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. अधिवेशनात शिवसेना (Shivsena) आणि भाजप यांच्यात सातत्याने आरोपप्रत्यारोप पहायला मिळत आहेत. दरम्यान, आज शिवसेना खासदार यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपाच्या चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना खोचक टोला लगावला आहे.

Chandrakant Patil on Sanjay Raut
पेन ड्राईव्हच्या अस्त्रामुळे ठाकरे सरकारचा 'खेळ खल्लास'- चित्रा वाघ

अग्रलेखातून त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसच्या (Congress) काळात दिल्लीपासून सर्वत्र चमच्यांची चलती होती. मोदी युगात चमच्यांची जागा अंधभक्तांनी घेतली, पण काम तेच आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील म्हणतात, 'मोदी 22 तास काम करतात. उरलेले दोन तास झोपही पंतप्रधानांना येऊ नये यावर संशोधन सुरू आहे.' चमच्यांचे हे विधान ऐकून पंतप्रधान मोदींची (PM Modi) दोन तासांची झोपही उडाली असेल!, असेही ते म्हणाले आहेत.

Chandrakant Patil on Sanjay Raut
'मातोश्री'ला २ कोटी आणि ५० लाखांचं घड्याळ, छाप्यात जाधवांची डायरी सापडली

मालिक तो महान है, बस चमचों से परेशान हैं

सध्या आपल्या देशात हेच वातावरण दिसत आहे. देशातील राजकारणात सरळ दोन गट पडले आहेत. भक्तांची फौज, त्यात पुन्हा अंधभक्तांचा प्रखर उपगट आहे, तर दुसऱ्या बाजूला इतरांचे चमचे महामंडळ. हे दोघेही देशासाठी खतरनाक आहेत. भांड, भाट आणि चमचे ज्या राज्याच्या निर्णय प्रक्रियेत सामील केले जातात ते राज्य रसातळाला जाते व राजा विश्वास गमावून बसतो. सध्या आपले पंतप्रधान श्री. मोदी अशाच चमचेगिरीच्या अतिरेकामुळे परेशान झाले आहेत. काँग्रेस काळात चमचे होते. मोदी काळात अंधभक्त आहेत. फक्त नामांतर झाले. काम तेच. देवकांत बरुआ यांनी ‘इंदिरा इज इंडिया’ अशी घोषणा दिली होती. आज मोदी भक्तांनी ‘मोदी इज इंडिया’ असे जाहीर केले. जे मोदींबरोबर नाहीत ते देशाबरोबर नाहीत असे टोक भक्तांनी गाठले, पण आता कडेलोट केलाय तो महाराष्ट्राचे चंद्रकांत पाटील यांनी. पाटील यांनी अंधभक्तीच्या चिपळ्या वाजवीत सांगितले, ‘‘श्री. नरेंद्र मोदी हे अखंड काम करतात. ते बावीस तास काम करतात व फक्त दोन तास झोपतात. आता ही दोन तासही झोप येऊ नये म्हणून प्रयत्न सुरू आहेत.’’ पाटलांची ही विधाने ऐकून दिल्लीत पंतप्रधान मोदींची दोन तासांची झोपही उडाली असेल. भक्तांना आणि चमच्यांना हे इतके मानसिक बळ येते कोठून, हाच संशोधनाचा विषय आहे.

उलथापालथ

जगाचा इतिहास चमचेगिरीच्या असंख्य कथा-दंतकथांनी भरला आहे. ‘जगातील उलथापालथीस महापुरुष नाही, तर चमचे जबाबदार आहेत,’ असे एका महान लेखकाने लिहून ठेवले आहे. हरिशंकर परसाई हे एक महान विनोदी लेखक. त्यांनी ‘चमच्यांची दिल्ली यात्रा’ असे एक बहारदार व्यंगलेखन केले होते. त्या काळातल्या दिल्लीचे योग्य वर्णन त्यांनी केले. ते म्हणाले, ‘‘माझा अंदाज आहे, या काळात देशाच्या राजकीय क्षेत्रात जवळ जवळ पाच हजार चमचे काम करीत आहेत. हे प्रमुख चमचे आहेत. मग स्थानिक चमचे, सहाय्यक चमचे, अतिरिक्त चमचे, खास चमचे अशा पदांवर हे लोक काम करीत आहेत. हे सर्व चमचे आपल्या नेत्याच्या अवतीभवती आशाळभूत नजरांनी लाभार्थी बनून वावरत आहेत. आपले इमान दाखविण्यासाठी ते चमचे कोणत्याही हीन पातळीवर जातील.’’ परसाई यांनी वर्णन केले तो काळ काँग्रेसचा दिल्लीतील सुवर्णकाळ होता. आज दिल्ली तीच आहे. चमच्यांची जागा भक्तांनी घेतली व त्यात ‘मीडिया’ नावाचा मोठा चमचाही सहभागी झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com