MVA PC  
महाराष्ट्र बातम्या

MVA PC :  कर्नाटकातील '४० टक्के कमिशन' टॅगलाईनच्या यशानंतर महाराष्ट्रात मविआचा 'खोके सरकार'ने प्रचार

Sandip Kapde

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज शरद पवार यांच्या निवास्थानी बैठक पार पडली. कर्नाटक निवडणूक आणि सत्तासंघर्षवरील निकालावर या बैठकित चर्चा करण्यात आली. यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली.

महाविकास आघाडी सक्षम आहे. लोकसभा, विधानसभेच्या जागा वाटपांबाबत देखील चर्चा झाली आहे. कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाला. तेथील भ्रष्टाचार लोकांनी नाकारला आहे. आम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडी सक्षम पर्याय देणार आहोत. उन्हाळा कमी झाल्यावर वज्रमुठ सभा होणार आहेत, असे पाटील यांनी सांगितले.

तिनही पक्ष एकसंधपणे लढणार तसेच जागा वाटपांबाबत घटकपक्षांसोबत आम्ही चर्चा करणार आहोत. महाविकास आघाडीत समन्वय ठेवण्यासाठी आजच्या बैठकीत एकमत झाल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

नाना पटोले काय म्हणाले?

महाराष्ट्राचे सरकार कर्नाटकच्या गेल्या सरकार पेक्षा भ्रष्टाचारी आहे. भाजपने तेथील लोकांना लुटले आहे. कर्नाटक विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. भविष्यात राज्यातील असंवैधानिक सरकारच्या विरोधात आम्ही लढणार आहोत. कर्नाटकच्या जनतेनं मोदी आणि शहा यांच्यावर आम्ही राग काढला. महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकार हद्दपार करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाल्याचे, नाना पटोले म्हणाले.

कर्नाटकात 40 टक्के कमिशन सरकार म्हणूम भाजप चर्चेत होते. तर महाराष्ट्रात खोके सरकार आहे, असे देखील नाना पटोले म्हणाले. 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, पक्षांतर्गत (MVA) कोणताही गैरसमज नाही. कर्नाटकात 40% भ्रष्टाचार झाला असेल तर महाराष्ट्रात 100% भ्रष्टाचार आहे, हे सध्याचे सरकार भ्रष्ट आहे आणि ते पराभूत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime: भोगावच्या सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर छापा! पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई; २६ ग्राहकांसह १५ बारबाला आढळल्या

Marathi News Live Updates : पुण्यात आज MPSC विद्यार्थ्यांचा मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Pune News: अतिउच्चदाब वीज वाहिनीत स्फोट, 3 लाखांवर ग्राहकांचा वीज खंडित; PMPच्या ७० बसची सेवा ठप्प, ८ मेट्रोगाड्या २२ मिनिटं जागेवरच थांबल्या

Nepal Flood: १० दिवस ढिगाऱ्याखाली, तरीही जीवंत! नेपाळमध्ये ६० वर्षीय महिलेची थरारक सुटका

Pune Railway: पुणेकरांसाठी गणेशोत्सवाची रेल्वे भेट! कोकणवासीय प्रवाशांची सोय, पुणे-रत्नागिरी मार्गावर सहा फेऱ्या

SCROLL FOR NEXT