Prithviraj Chavan esakal
महाराष्ट्र बातम्या

अध्यक्षपदाबाबत पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान; म्हणाले, पक्षश्रेष्ठींनी मला..

सकाळ डिजिटल टीम

'पक्षश्रेष्ठी अध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असेल ते ठरवतील; पण..'

मुंबई : हिवाळी अधिवेशनात विधीमंडळाच्या अध्यक्षांची निवड होणार आहे. विधीमंडळ अधिवेशनाचा (Assembly Winter Session) आज पहिलाच दिवस आहे. त्यापूर्वी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) आमदारांची बैठक होत आहे, तर दुसरीकडे विधानसभेच्या अध्यक्षाची निवड 27 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. परंतु, आमदार चव्हाणांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, मला अजून काहीही विचारणा झालेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

आमदार चव्हाण पुढे म्हणाले, विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. पक्षश्रेष्ठी अध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असेल ते ठरवतील. मात्र, मला अजून काहीही विचारणा झालेली नाही, पक्षश्रेष्ठींना अध्यक्षपद ठरविण्याचा अधिकार आहे. तसेच आवाजी मतदान होणार आहे, याबाबत विरोधक चुकीची माहिती पसरवत आहेत. पण, नियमांना धरूनच आवाजी मतदान होणार आहे. त्यामुळं विरोधक फक्त आरोप करत असून त्यांच्या आरोपांना महाविकास आघाडी सरकार उत्तरे देईल, असं ठाम मत आमदार चव्हाण यांनी व्यक्त केलं.

विधानसभा अध्यक्षांबाबत हायकमांड जो काही निर्णय घेईल तो सर्वांना मान्य राहील, असं नाना पटोलेंनी सांगितलंय. भोरचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांचं नाव आघाडीवर असलं, तरी विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचे नेते होते. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची जागा रिक्त झालीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; गणेशोत्सव काळात ११ पासून टप्प्याटप्प्याने अंमल, परिवहन विभागाचा आदेश

Kolhapur News: मंडपांमुळे उपचारास विलंब; काेल्हापूरमधील शिवाजी पेठेतील महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT