विधानसभा अध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्र्यांचं नाव चर्चेत; 'या' आमदारालाही संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prithviraj Chavan

हिवाळी अधिवेशनात विधीमंडळाच्या अध्यक्षांची निवड होणार आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्र्यांचं नाव चर्चेत

मुंबई : हिवाळी अधिवेशनात विधीमंडळाच्या अध्यक्षांची निवड होणार आहे. विधीमंडळ अधिवेशनाचा (Assembly Winter Session) आज पहिलाच दिवस आहे. त्यापूर्वी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) आमदारांची बैठक होत आहे, तर दुसरीकडे विधानसभेच्या अध्यक्षाची निवड 27 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस नेत्यांच्या दिल्लीतील बैठकीनंतर ही माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिलीय. पटोले, नितीन राऊत (Nitin Raut), सुनिल केदार हे काल दिल्ली दौऱ्यावर होते.

विधानसभा अध्यक्षांबाबत हायकमांड जो काही निर्णय घेईल तो सर्वांना मान्य राहील, असं नाना पटोलेंनी सांगितलंय. भोरचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांचं नाव आघाडीवर असलं, तरी विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचे नेते होते. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची जागा रिक्त झालीय. काँग्रेसचे नेते वेणूगोपाल आणि एच. के. पाटील यांच्यासोबत काल एक भेट झाली असून बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचंही पटोलेंनी सांगितलंय. त्यामुळं अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.