Raghunath Kuchik टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

बलात्काराच्या गुन्ह्यानंतर शिवसेना उपनेत्यांनी दिली प्रतिक्रिया

हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असून माझे कामगार क्षेत्रातील काम आणि माझी अनेक वर्षांची राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे - रघुनाथ कुचिक

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेचे (Shiv Sena) उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका 24 वर्षीय तरुणीने कुचिक यांच्या विरोधात तक्रार दिली होती. लग्नाचं आमिष दाखवून कुचिक यांनी शारिरीक संबंध ठेवले आणि गर्भवती राहिल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीनं गर्भपात करण्यास भाग पाडलं, असा आरोप या तरुणीनं तक्रारीत केला होता. यावर आता रघुनाथ कुचिक यांनी त्यांच्याविरोधातील आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे.

रघुनाथ कुचिक म्हणाले, “मला आणि माझ्या कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी एक राजकीय षडयंत्र, हनी ट्रॅपसारखे प्रकरण तयार करुन हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असून माझे कामगार क्षेत्रातील काम आणि माझी अनेक वर्षांची राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे.”

माझा तपास यंत्रणांवर पूर्ण विश्वास असल्याचेही रघुनाथ कुचिक म्हणाले. “मला पूर्ण खात्री आहे, की तपास यंत्रणा या प्रकरणाचा संपूर्ण तपास करतील आणि मला न्याय मिळवू देतील. तसेच याबाबत आज खटला दाखल झाल्याने मी आज जास्त काही बोलणार नाही, मात्र माझी कायदेशीर टीम काम करत असून पुढील एक ते दोन दिवसांमध्ये याबाबत कागदपत्रांसह सविस्तर बाजू मांडणार” असे कुचिक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंधन तेलाच्या दराचा भडका उडणार, USचा खार्ग बेटावर हल्ला; ९० टक्के कच्च्या तेलाची इथूनच होते निर्यात

IT Park Kolhapur : कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी जमीन हस्तांतरणाचा आदेश, महानगरपालिकेची परवानगी घ्यावीच लागणार

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

एका दिवसाच्या सोबतीसाठी वाट्टेल ते! साई पल्लवीचा अमिर खानच्या लेकासोबत रोमान्स, अनोखी प्रेमकहाणी चर्चेत

Paithan News: नाथषष्ठी यात्रेत पैठणची बाजारपेठ फुलली; तीन दिवसांत २५ कोटींची उलाढाल; संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेत भाविकांची गर्दी,

SCROLL FOR NEXT