Vande Bharat Express esakal
महाराष्ट्र बातम्या

Railway: महाराष्ट्रात धावणार अजून एक वंदे भारत एक्सप्रेस; स्वतः पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन

प्रवाशांना वेगवान, सुरक्षित, सर्व सोईसुविधा, आरामदायी प्रवास द्यावा या दृष्टीने भारतीय रेल्वे मेड इन इंडियाअंतर्गत देशभरात हायस्पीड वंदे भारत ट्रेन सुरु केला आहे. वंदे भारत ट्रेन सारख्या सेमी हायस्पीड रेल्वे प्रत्यक्षात सुरू करून भारतीय रेल्वेने जगभरात वेगळा ठसा उमटवला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Vande Bharat: राज्यातील सातवी आणि मुंबईला जोडणारी पाचवी हायस्पीड वंदे भारत ट्रेन शनिवारपासून धावणार आहे. या हायस्पीड वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहे. उद्घाटनानंतर १ जानेवारी २०२४ पासून ही गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होणार आहे. आठवड्यातून सहा दिवस वंदे भारत ट्रेन धावणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

प्रवाशांना वेगवान, सुरक्षित, सर्व सोईसुविधा, आरामदायी प्रवास द्यावा या दृष्टीने भारतीय रेल्वे मेड इन इंडियाअंतर्गत देशभरात हायस्पीड वंदे भारत ट्रेन सुरु केला आहे. वंदे भारत ट्रेन सारख्या सेमी हायस्पीड रेल्वे प्रत्यक्षात सुरू करून भारतीय रेल्वेने जगभरात वेगळा ठसा उमटवला आहे.

प्रत्येक राज्यातून वंदे भारत चालविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे. महाराष्ट्र राज्यात सध्या सहा वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. आता राज्याला सातवी वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. सातवी वंदे भारत ट्रेन जालना ते मुंबई दरम्यान शनिवारपासून धावणार आहे. जालना ते मुंबई दरम्यान वाढणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस ही आठ डब्यांची असणार आहे.

कसं असेल वेळापत्रक?

जालना आणि मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी जालना रेल्वे स्थानकातून पहाटे ५.०५ मिनिटांनी ही गाडी सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे ही एक्स्प्रेस १२ ला पोहोचेल. तर मुंबईहून दुपारी १.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटेल आणि जालन्यात रात्री ८.३० वाजता वंदे भारत ट्रेन पोहोचणार आहे. जालना- मुंबई वंदे भारत ट्रेनला छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक आणि ठाणे असे चार थांबे असणार असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आठ गाडयांचे पंतप्रधान करणार उदघाटन -

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० डिसेंबर रोजी सकाळी ११.४० वाजता अयोध्येत सहा वंदे भारत आणि दोन अमृत भारत यासह आठ एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखविणार आहे. अयोध्या-दरभंगा आणि मालना टाउन-बेंगळुरू अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखविणार आहे. याशिवाय अयोध्या- आनंद बिहार टर्मिनल , कोईम्बतूर-बेंगळुरू , मंगळुरू-मडगाव , जालना-मुंबई , श्री माता वैष्णोदेवी कटरा-दिल्ली आणि अमृतसर- दिल्ली वंदे भारत ट्रेनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ट्रेनला हिरवा झेंडा दाखविणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT