NCP
NCP 
महाराष्ट्र

राष्ट्रवादीने प्रदेश उपाध्यक्षाला केले निलंबित; खंडणी प्रकरणात होतेय चौकशी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल
यांची शनिवारी (ता.14) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पुण्यातील सराफी व्यावसायिकास 50 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात पुणे पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या चौकशीमुळे
बांदल यांच्यावर पक्षाने ही कारवाई केली आहे.

याबाबतचे पत्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी पाठविले असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादी कॉंग्रेसने बांदल यांना
दुसऱ्यांदा पक्षातून निलंबित केले आहे. याआधी 2015 मध्ये पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पहिल्यांदा बांदल यांची पाच वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केले होते. तेव्हा बांदल हे जिल्हा
परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती होते. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतरही बांदल यांनी या पक्षामुळे मिळालेल्या बांधकाम व आरोग्य समिती सभापतिपदाचा राजीनामा दिला नव्हता.

त्यानंतर 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत बांदल यांनी लोकशाही क्रांती आघाडीची स्थापना केली आणि पत्नी रेखा बांदल यांना या आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेवर निवडून आणले. या निवडणुकीनंतर बांदल यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा पक्षात परत घेत, प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती.

गारटकर म्हणाले, ''एका नेत्याचे विचार म्हणजे ते संपूर्ण पक्षाचे विचार नसतात. चुकीच्या नेत्यांच्या अपप्रवृत्तीला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कधीही खतपाणी घालत नाही. त्याचाच भाग म्हणून पक्षस्तरावरून बांदल यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI IPL 2024 : लखनौनं मुंबईची कडवी झुंज काढली मोडून; गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT