कोरोनाच्या धास्तीमुळे RSS ने घेतला महत्त्वाचा निर्णय!

RSS
RSS

नवी दिल्ली : कोरोनाच्या धास्तीमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बंगळूर येथे उद्यापासून (ता. १५) होणारी संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा तडकाफडकी स्थगित करण्यात आली आहे. संघाचे सरकार्यवाह सुरेश ऊर्फ भय्याजी जोशी यांनी शनिवारी (ता.१४) जारी केलेल्या निवेदनात हा निर्णय कळविण्यात आला. या बैठकीत देशभरातील १५०० स्वयंसेवक पदाधिकारी भाग घेणार होते.

संघाची प्रतिनिधी सभा १५ ते १७ मार्चपर्यंत बंगळूरच्या चेन्नईथला भागात होणार होती. संघाची ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण असते, कारण तीत संघपरिवाराच्या आगामी वार्षिक धोरणांची भूमिका तसेच रोडमॅप निश्‍चित केला जातो. लोकसभा निवडणुकीच्या वर्षी ही बैठक नागपुरात घेण्याचा प्रघात आहे. यंदा ही बैठक बंगळूरमध्ये होणार होती. मात्र, कोरोनाच्या धास्तीमुळे संघाने ही सभा रद्द केली आहे. 

जोशी यांनी निवेदनात म्हटले आहे, की ‘कोविड-१९’ चे गंभीर परिणाम लक्षात घेऊन तसेच केंद्र व राज्य सरकारांनी केलेल्या सूचनांच्या पार्श्‍वभूमीवर बंगळूर येथे होणारी अखिल भारतीय प्रतिनिधी सभा स्थगित करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी संघाच्या स्वयंसेवकांनी आपापल्या भागात स्वच्छतेबाबतची जागरूकता निर्माण करावी व या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी स्थानिक प्रशासनांना मदत करावी. 

अनेक जण प्रवासात 

प्रतिनिधी सभेत संघाचे देशविदेशांतील प्रतिनिधी हजर असतात. संघ व संघपरिवारातील भाजपसह साऱ्या संघटना व संस्थांचे अधिकारी यात आपापल्या कामाचे वार्षिक अहवाल सादर करतात.

बैठक रद्द होण्याची पूर्वकल्पना नसल्याने यावर्षीच्या बैठकीसाठी अनेक संघ पदाधिकारी बंगळूरात दाखल झाले आहेत आणि शेकडो लोक बंगळूरच्या दिशेने प्रवासात आहेत. खुद्द सरसंघचालकांसह भय्याजी, भाजप संघटनमंत्री बी. एल. संतोष, महासचिव राम माधव आदी यापूर्वीच दाखल झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com