Subhash-Desai
Subhash-Desai 
महाराष्ट्र

भूमिपुत्रांसाठीचे आरक्षण असंघटित क्षेत्रातही 

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई - मुंबई तसेच महाराष्ट्रात भूमिपुत्रांच्या लढ्याला आवाज देणाऱ्या शिवसेनेने रोजगारात निश्‍चित करण्यात आलेले ८० टक्‍के आरक्षण असंघटितांनाही लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोंढ्यांमुळे स्थानिकांचे होणारे नुकसान टाळत मराठी माणसाला न्याय देण्याची घोषणा उद्धव ठाकरे सरकारच्या किमान समान कार्यक्रमात अंतर्भूत करण्यात आल्यानंतर आता राज्यातील रोजगाराच्या सर्व संधींत ८० टक्‍के आरक्षण ठेवण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील नोंदणीकृत प्रतिष्ठानांत ८० टक्‍के संधी स्थानिकांना देण्याचा कायदा २००८ पासूनच अमलात आहे. मात्र, आता असंघटित क्षेत्रातही हा निकष लावण्याच्या सूचना ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई यांनी जारी केल्या आहेत. 

राज्यात उपलब्ध असलेल्या रोजगाराचे प्रमाण संघटित क्षेत्रात एक तर असंघटित क्षेत्रात तीन असे आहे. एकास तीन या प्रमाणात असे रोजगाराचे प्रमाण असल्याने केवळ संघटित क्षेत्रासाठी हा कायदा करून उपयोग होणार नाही, तर त्याची अंमलबजावणी अधिक रोजगार निर्माण करणाऱ्या असंघटित क्षेत्रात करावी, असे प्रयत्न सुरू होणार आहेत. राज्यातील शहरी भागातील ६३ टक्‍के तर ग्रामीण भागातील ४५ टक्‍के रोजगार असंघटित क्षेत्रात आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

SCROLL FOR NEXT