Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

मविआतून बाहेर पडायला तयार, पण..; राऊतांची एकनाथ शिंदेंना अट

सकाळ डिजिटल टीम

'शिवसेनेनं मविआतून बाहेर पडलं पाहिजे असं वाटतं असेल, तर 24 तासांत मुंबईत परत या.'

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानं शिवसेनेला अक्षरशः घाम फोडलाय. पण, अजूनही परिस्थिती नियंत्रणात आहे, असा दावा संजय राऊत करताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेवरच (Shiv sena) दावा ठोकतील, धनुष्यबाण टेक ओव्हर करतील, अशी शक्यता निर्माण झालीय.

दरम्यान, शिवसेनेनं मविआतून बाहेर पडलं पाहिजे असं वाटतं असेल, तर 24 तासांत मुंबईत या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) चर्चा करा, असं थेट आवाहन शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदेंना केलंय. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. संजय राऊत पुढं म्हणाले, बंडखोर आमदारांनी महाराष्ट्रात येऊन चर्चा करावी. गुवाहाटीमध्ये बसून पत्रव्यवहार करु नये, असा सल्ला वजा इशाराही त्यांनी आमदारांना दिलाय.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांची संख्या वाढलीय. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतही शिवसेनेच्या घडामोडींना वेग आलाय. मुंबईत आज पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी या संपूर्ण घडामोडींवर भाष्य केलंय. आमदार आणि पक्ष यात फरक आहे, असं ते म्हणाले. आमदार म्हणजे पक्ष नव्हेत, असं म्हणतानाच राऊतांनी शिंदे यांना टोला लगावलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Thane Rain Traffic : मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाचा जोर; पुढील २४ तास महत्त्वाचे, वाहतूक कोंडीची काय आहे स्थिती?

Ben Stokes Century: निवृत्तीनंतरही बेन स्टोक्सचा जलवा; १२ वर्षानंतर संघात परतला अन् पहिल्याच सामन्यात वादळी शतक ठोकले

Live Updates Marathi : भाजप आज देशभरातील काँग्रेस कार्यालयांसमोर निदर्शने करणार

MHADA Pune: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! म्हाडाच्या ताथवडे प्रकल्पातील ६३४ फ्लॅट्सची दुसरी सोडत जाहीर

Vidarbha Rain: विदर्भात पावसाला सुरवात, बळीराजा सुखावला; पिकांना जीवदान, शेतकऱ्यांना दिलासा, अनेक जिल्ह्यांत शेतीकामांना वेग

SCROLL FOR NEXT