यशदा - इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ स्पिरिच्युअल इंडिया महोत्सवाअंतर्गत डॉ. मंजिरी प्रभू यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्याशी संवाद साधला.
यशदा - इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ स्पिरिच्युअल इंडिया महोत्सवाअंतर्गत डॉ. मंजिरी प्रभू यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्याशी संवाद साधला. 
महाराष्ट्र

सकारात्मकता हा ‘सकाळ’चा गाभा - पवार

सकाळवृत्तसेवा

पुणे - सकारात्मकता हा ‘सकाळ’चा गाभा असून, लाखो वाचकांचा विश्वास हे बळ आहे. समाजाला प्रगतीच्या दिशेने नेण्याची जबाबदारी वाचक हक्काने सोपवतात आणि ती जबाबदारी कसोशीने पार पाडण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे विचारी आणि समाजाप्रती कळकळ असणारे घटक ‘सकाळ’च्या वाटचालीत अखंड सोबत आहेत, असा विश्‍वास ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी रविवारी व्यक्त केला.

पहिल्या इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ स्पिरिच्युअल इंडिया महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी आयोजक, लेखिका डॉ. मंजिरी प्रभू यांनी पवार यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. डॉ. प्रभू आणि उपस्थितांच्या प्रश्नांना पवार यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली. राजकारण, समाजकारण, अर्थकारणासह शैक्षणिक, कृषी क्षेत्रांतील ‘सकाळ’ची भूमिकाही त्यांनी खुलेपणाने मांडली. राजकीय पक्षांची धोरणे, भूमिका, सामान्य लोकांच्या अपेक्षा आणि ‘सकाळ’ हे समीकरण पवार यांनी उलगडून दाखविले. 

ते म्हणाले, ‘‘सकारात्मक बाबींकडेही आपण अनेकदा नकारात्मक भावनेने पाहतो. त्यामुळेच आजूबाजूला जेवढे चांगले घडते, तेही स्वीकारण्याच्या मनःस्थितीत नसतो. जे जे समाजाच्या भल्याचे ते ते ‘सकाळ’ निडरपणे मांडत आला आहे आणि मांडत राहील. प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचारामागे समाजमनही कारणीभूत आहे का, याचा विचार केला पाहिजे.’’ 

राज्यभरात ‘सकाळ’ हा लोकांच्या जीवनाचा भाग झाला आहे. प्रत्येक घटकाच्या हृदयाशी तो जोडला आहे. याच बळावर वाटचाल सुरू आहे. राजकारणी व्यक्तींचा दबाव न जुमानता माध्यम संस्था ठाम उभी राहून, 
समाजाच्या भल्यासाठी काम करू शकते, ते सिद्ध केले आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.

मुलाखतीचा उत्तरार्धही रंगला! 
कार्यक्रमाला निरनिराळ्या क्षेत्रांतील मंडळी उपस्थित होती. विविध प्रश्‍नांची मनमोकळेपणे उत्तरे देत पवार यांनी सभागृहातील गर्दीचा ताबा घेतला आणि प्रेक्षकांनाही बोलके केले. मुलाखत आटोपताच गर्दीतून आलेल्या प्रश्‍नांना त्यांनी तेवढ्याच तत्परतेने उत्तरेही दिली. परिणामी, मुलाखतीचा 
उत्तरार्धही रंगला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: काँग्रेसने 'कलम 370'ला आपल्या अवैध मुलाप्रमाणे सांभाळलं; अमित शाहांची बोचरी टीका

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT