Sakal-Saam Survey 
महाराष्ट्र बातम्या

Sakal-Saam Survey: भाजपने शिंदेंना सोबत घेऊन चूक केली? सर्वपक्षीय समर्थक म्हणतात, ते...

रवींद्र देशमुख

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून सातत्याने धक्कादायक घडामोडी घडत आहे. या घडामोडींना खरी सुरुवात २०१९ विधान सभा निवडणुकीच्या निकालानंतर झाली. मात्र याचा खरा क्लॅमेक्स ९ महिन्यांपूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडामुळे पाहायला मिळाला. आता या घडामोडींबाबत महाराष्ट्रातील सर्वपक्षीय समर्थकांना काय वाटतं? याचं सर्वेक्षण 'सकाळ-साम'ने केलं आहे. यामध्ये समर्थकांच्या भावना जाणून घेण्यात आल्या.

एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी शिवसेनेत अभूतपूर्व बंड घडवून आणत, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पाडलं. तसेच भाजपसोबत जावून मुख्यमंत्रीपद मिळवलं. त्यामुळे शिंदे यांचं बंड यशस्वी झालं, असं सांगण्यात येतय. शिवाय शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हही मिळालं. मात्र शिंदे यांच्या बंडानंतर भाजपने त्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करून चूक केली का? असा प्रश्न सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना सकाळ-साम सर्वेक्षणात विचारण्यात आला.

यानुसार, भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेत जावून चूक केल्याचं मत ५७.५ टक्के लोकांनी व्यक्त केलं. तर ३१.९ टक्के लोकांना ही चूक वाटत नाही. तर १०.६ टक्के लोक हे चूक की बरोबर हे सांगू शकले नाहीत. एकंदरीतच भाजपने एकनाथ शिंदेंसोबत जाणे बहुतांशी समर्थकांना आवडलेलं दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT