Sanjay Nirupam
Sanjay Nirupam 
महाराष्ट्र

Loksabha 2019 : वायव्य मुंबईतून संजय निरुपम; मुंबई प्रदेशाध्यक्षपदी देवरा 

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : कॉंग्रेसने वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून संजय निरुपम यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, मुंबई कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडून काढून घेत दक्षिण मुंबईतील उमेदवार असलेल्या मिलिंद देवरा यांना सोपविली आहे. आर्थिक राजधानीतून कॉंग्रेसच्या तिजोरीतील खडखडाट दूर करण्यासाठी देवरा यांच्याकडे नेतृत्व दिल्याचे मानले जात आहे. उत्तर मुंबईतून कॉंग्रेसचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत संजय निरुपम यांनी उत्तर मुंबईतून निवडणूक लढविली होती, तर वायव्य मुंबई हा गुरुदास कामत यांचा मतदारसंघ होता. कामत यांच्या निधनानंतर कॉंग्रेसच्या दृष्टीने सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायव्य मुंबईतून 
लढण्यासाठी निरुपम यांच्यासह कृपाशंकर सिंह, प्रियांका चतुर्वेदी यांच्यात चढाओढ सुरू होती. अखेर निरुपम यांनी उमेदवारी मिळविण्यात बाजी मारली. गुरुदास कामत गट विरुद्ध संजय निरुपम गट या संघर्षामुळे मुंबई प्रदेश कॉंग्रेस संघटना नेहमी चर्चेत होती. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा धुव्वा उडाल्यावर निरुपम घरी जाणार अशी चर्चा होती. मात्र पक्ष नेतृत्वाकडून अभय मिळून ते अखेरपर्यंत पदावर टिकून राहिले. आताही अपेक्षित मतदारसंघ पदरात पाडून घेण्यात ते यशस्वी ठरले. निरुपम यांची लढत शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांच्याशी होईल. 

वडिलांनंतर मुलगा 
ऐन निवडणुकीच्या काळात मुंबईत नेतृत्व बदल करताना कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मिलिंद देवरा यांची मुंबई कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. याआधी मिलिंद यांचे वडील मुरली देवरा प्रदीर्घकाळ मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. कॉंग्रेसने मिलिंद देवरा यांना आधीच दक्षिण मुंबईतून निवडणूक रिंगणात उतरविले आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्याशी त्यांचा सामना रंगणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT