Sharad Pawar Resigns
Sharad Pawar Resigns  
महाराष्ट्र

Sharad Pawar Resigns : कार्यकर्त्यांच्या मनधरणीनंतर शरद पवार पहिल्यांदा बोलले...

Sandip Kapde

Sharad Pawar : भारताच्या राजकारणातील ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा लवकरच राजीनामा देणार असल्याचे सांगितले.

शरद पवार यांनी पुढील निवडणूक लढवणार नसल्याची माहिती दिली. अध्यक्षपद सोडल्याच्या वृत्ताने राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहन पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत.

दरम्यान शरद पवार यांना राष्ट्रवादीतील सर्व नेत्यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यावेळी जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले. कार्यकर्ते देखील भावनिक झाले आहे. अजित पवार यांनी या निर्णयाचे समर्थन केले. कोणीही अध्यक्ष झाले तरी शरद पवारांच्या जीवावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालणार आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

यावेळी शरद पवार यांनी देखील कार्यकर्त्यांना संबोधित केले. शरद पवार म्हणाले, मी तुमच्या सोबतच आहे.

अजित पवार काय म्हणाले?

अजित पवार म्हणाले, "तुम्ही एक गैरसमज करुन घेत आहात की पवार साहेब अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षामध्ये नाहीत असा भाग नाही. आज काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आहेत पण सोनिया गांधींकडं पाहून चालली आहे. त्यामुळं शरद पवारांच्या आजच्या वयाचा विचार करता साहेबांशी आणि सर्वांशी चर्चा करुन एका नवीन नेतृत्वाकडं आपण ही जबाबदारी देऊ पाहतो आहोत. ते नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टीचं काम करेल"

"शेवटी साहेब म्हणजेच पार्टी आहेत, हे कुणी येऱ्या गबाळ्यानं पण सांगायचं कारण नाही. आता पवार साहेबांनी निर्णय घेतला आहे. पवार साहेब लोकशाहीत जनतेचं ऐकत असतात हे मी कित्येक वर्षे पाहिलेलं आहे. चव्हाण प्रतिष्ठाण, सिल्व्हर ओकवरुन तुम्हाला साहेब आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतील. उद्या जो पार्टीचा अध्यक्ष होईल, तो पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT