Sharad Pawar Threat
Sharad Pawar Threat 
महाराष्ट्र

Sharad Pawar Threat : "बावनकुळे म्हणतात आमच्या रक्तात नाही, पण त्यांच्यासोबतच पवारांना धमकी देणाऱ्याचा फोटो!"

Sandip Kapde

Sharad Pawar Threat : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.  खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिसांकडे मदत आणि न्यायाचे आवाहन केले आहे. सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान शरद पवार यांना ट्विटरवर धमकी देणाऱ्याने स्वत:ला भाजप कार्यकर्ता म्हटले आहे. सौरभ पिंपळकर असे या युवकाचे नाव आहे. दरम्यान  सौरभ पिंपळकर याचे भाजपच्या मोठ्या नेत्यासोबत फोटो व्हायरल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सौरभ पिंपळकर याचे फोटो ट्विट केले आहेत.

धमकी देण आमच्या रक्तात नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते. पण मिटकरी यांनी  सौरभ पिंपळकरचा बावनकुळे यांच्यासोबुत असलेला फोटो ट्वीट करत हे रक्त कुणाचे असा सवाल केला आहे.

अमोल मिटीकरी म्हणाले, बावनकुळे म्हणाले धमकी देणे भाजपच्या रक्तात नाही. मात्र पिंपळकर याचे बावनकुळे, श्रीकांत भारतीय, रावसाहेब दानवे यांच्यासोबत फोटो आहेत. मग हे रक्त कुणाचे आहे. हे रक्त भाजपच आहे की आणखी कुणाच आहे, याच उत्तर बावनकुळे साहेबांनी सांगाव, हा माझा प्रश्न आहे.

या धमकीमागे भाजप आहे, हे खोट असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या शंकाचे उत्तर द्यावे. हा आरोपी साधासुधा आरोपी नाही, असे अमोल मिटकरी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024 : केजरीवालांच्या भविष्यवाणीवर अमित शाहांचं उत्तर; म्हणाले, संविधानात कुठे लिहिलंय की मोदी...

James Anderson Retirement : बाजूला होण्याची हीच योग्य वेळ... जेम्स अँडरसनने पोस्ट करून सांगितला निवृत्तीचा प्लॅन

Latest Marathi News Live Update: लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात देशभरात ६५.६८ टक्के मतदान

मावळमध्ये कोणाचा मुलगा पडला? मुलीलाही निवडून आणता आलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना बजरंग सोनवणेंचे प्रत्युत्तर

Asaduddin Owaisi: "इथं जन्मलो, इथंच मरणार, देशातून पुन्हा..."; ओवैसींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT