Navneet Rana: खासदार नवनीत राणांना प्रकरणच माहिती नाही! तरीही कोल्हापूर दंगल घटनेवर म्हणाल्या...

एका संवेदनशील प्रकरणावर प्रतिक्रिया देताना नेमकं कुठं काय घडलंय? राणांना माहितीचं नाही.
Navneet Rana: खासदार नवनीत राणांना प्रकरणच माहिती नाही! तरीही कोल्हापूर दंगल घटनेवर म्हणाल्या...

मुंबई : औरंगजेबवरुन महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यामुळं कोल्हापुरातही दंगलीचा प्रकार घडला. या संवेदनशील प्रकरणावर खासदार नवनीत राणा यांनी एक व्हिडिओ प्रसारित करत प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी याच्या मास्टरमाईंडला इशारा दिला आहे. पण नेमकं कुठे काय घडलं? हे त्यांना माहितीच नसल्याचं दिसून आलं आहे. (MP Navneet Rana does not know the case Still said on Kolhapur riot incident)

"दोन-तीन दिवसांपासून जे कोल्हापूरात आपण पाहिलं की औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचण्याचा प्रयत्न केला आहे, हा औरंगजेब माझ्या महाराष्ट्रात चालणार नाही. मी सरकारला विनंती करते की यामागचे जे मास्टरमाईंड आहेत ते महाराष्ट्राची विचारधारा वेगळी करु पाहत आहे. जे मास्टरमाईंड यामागं काम करत आहेत त्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली जावी. नाहीतर महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेवर चालणारे आमच्यासारखे जे मावळे आहेत. ते औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचणाऱ्यांना सहन करणार नाहीत" असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

Navneet Rana: खासदार नवनीत राणांना प्रकरणच माहिती नाही! तरीही कोल्हापूर दंगल घटनेवर म्हणाल्या...
Beed Accident: बीडमध्ये भीषण अपघात; दोन डॉक्टरांचा जागीच मृत्यू!

नवनीत राणा कुठे चुकल्या?

नवनीत राणा प्रतिक्रिया देताना सुरुवातीलाच म्हणाल्या की, "कोल्हापूरात आपण पाहिलं की औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचण्याचा प्रयत्न केला आहे. हा औरंगजेब माझ्या महाराष्ट्रात चालणार नाही. नाहीतर महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेवर चालणारे आमच्यासारखे जे मावळे आहेत. ते औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचणाऱ्यांना सहन करणार नाहीत"

पण कोल्हापुरात औरंगजेबाचे फोटो नाचवण्यात आलेच नव्हते! हा प्रकार अहमदनगरमधील फकीरवाडा परिसरात घडला होता. संदलच्या उरुसादरम्यान डीजेवर नाचताना काही तरुणांनी हातात औरंजेबाचे फोटो घेऊन घोषणाबाजी करतानाचे व्हिडिओ समोर आले होते. यावरुन भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Marathi Tajya Batmya)

कोल्हापुरात नेमकं काय घडलं होतं?

सोशल मीडियात औरंगजेबाचे स्टेट्स ठेवल्यानं कोल्हापुरात दोन गटांत वाद निर्माण झाला होता. यामुळं तणावाचं वातावरण निर्माण होऊन हिंदुत्ववादी संघटनांनी शहर बंदची घोषणा केली होती. या घोषणेनंतर दुसऱ्या दिवशी कोल्हापूरात बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. शहरातील दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते.

या बंद दरम्यान, शहरातील विशिष्ट भागात दगडफेकीची घटना घडली होती. ही एकूणच तणावाची परिस्थिती औरंगजेबाचं स्टेट्स ठेवल्यानं उद्भवली होती, या ठिकाणी औरंगजेबाचे फोटो नाचवण्यात आले नव्हते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com