Abdul Sattar VS Hemant Patil Esakal
महाराष्ट्र बातम्या

Abdul Sattar VS Hemant Patil: शिंदे गटाच्या खासदार अन् मंत्र्यांकडून एकमेकांना अश्लिल शिवीगाळ...; ऑडिओ क्लिप व्हायरल

Abdul Sattar VS Hemant Patil: शिवसेनेचे (शिंदे गटाचे) मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांची एकमेकांना शिवीगाळ करण्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणातील नेहमीच नाराजी आणि खडाजंगी कायमच दिसून येते. मात्र, आता एकाच पक्षातील मंत्री आणि खासदार यांच्या शिवीगाळ आणि खडाजंगी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवसेनेचे (शिंदे गटाचे) मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांची एकमेकांना शिवीगाळ करण्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठकीत दोघांमध्ये शिवीगाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. अब्दुल सत्तार हे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तर हेमंत पाटील हे हिंगोलीचे खासदार आहेत.

हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडली. या बैठकीमध्ये निधी वितरित करण्याच्या कारणावरून आणि टक्केवारीच्या कारणावरून हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचं दिसून आलं. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना चक्क शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची 'सकाळ' पुष्टी करत नाही. पण ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपवरुन सामान्यांसह राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उत्साही तरुणांवर पोलिसांना लाठ्या चालवण्याचे आदेश जाहीरपणे दिले होते. यावेळी गर्दीला उद्देशून अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली होती. हे प्रकरण चर्चेत असतानाच, सत्तारांनी आता थेट आपल्याच पक्षाच्या खासदाराला दम भरल्याचा प्रकार समोर आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT