MNS News: आगामी निवडणुकांची तयारी सुरू असतानाच पुण्यात मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Pune Political News : बैठका, चर्चा सुरू असतानाच पुण्यात मनसेला खिंडार पडल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
MNS News
MNS Newsesakal

आगामी निवडणुकांसाठा सर्वच पक्षांना जोरदार तयारी सुरू केली आहे. सभा, बैठका, दौरे, जागावाटप यांच्या चर्चा सुरू आहेत. इतर पक्षांप्रमाणेच मनसेने देखील आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे, बैठका, चर्चा सुरू असतानाच पुण्यात मनसेला खिंडार पडल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मनसेचे पदाधिकारी असलेल्या मंदार बलकवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काल(शनिवारी) भाजपच्या सुपर वॉरियर्स बैठकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मनसेला पुण्यात मोठा धक्का बसला आहे.

MNS News
Shivsena: खरी शिवसेना कोणाची? हे ठरवणे अध्यक्षांसमोरचे आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत येणार निकाल

राज्यात येत्या काळात मोठे भूकंप होणार- बावनकुळे

पक्षाच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यावर मोठ्या नेत्यांचे पक्ष प्रवेश करून घेण्याची जबाबदारी टाकली आहे. जानेवारी महिना पक्ष प्रवेशासाठी दिला आहे. येत्या काळात मोठे भूकंप होणार आहेत, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

MNS News
Loksabha Election : '2009 च्या निवडणुकीत झालेली जखम मी अजून विसरलेलो नाही'; संभाजीराजेंचं कोणाला उद्देशून वक्तव्य?

'गेल्या २५ वर्षात जे आमदार झाले, खासदार झाले, निवडणुकांमध्ये पडले असले तरीही अशा नेत्यांना पक्षामध्ये घेऊन त्यांना सक्रीय करा असे आदेश पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात अनेक मोठे पक्षप्रवेश होणार आहेत. भाजपचे तुम्ही कार्यकर्ते आहात, तुम्ही करतपण बाहेरचा कोणताही व्यक्ती येऊन तुमचा नेता होऊ नये? असे मला वाटते. त्यामुळे तुम्ही कामाला लागा', अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

MNS News
Bhavana Gawli: भावना गवळी यांना मोठा धक्का! संस्थेचे खाते आयकर विभागाने गोठवले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com