Eknath Shinde  esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: CM शिंदेंची डोकेदुखी वाढली; ठाण्यात शिवसेनेचे दोन गट भिडले, अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

रुपेश नामदास

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्याच शिवसेनेचे दोन गट एकमेकांना भिडल्याची घटना समोर आली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्या गटात हा राडा झाला आहे.

शिवसेनेच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. त्यामुळे हा वाद विकोपाला गेला असून हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले आहे. मागील काही दिवसांपूर्वी याच दोन्ही गटामध्ये वाद झाला होता. आता पुन्हा हा वाद पेटला आहे.

या वादामुळे शिवसेना आणि ठाण्यातील शिंदे गटातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. ठाण्यातील वर्तक नगर येथील कन्स्ट्रक्शन साईडचे काम मिळण्यावरून प्रताप सरनाईक आणि दिलीप बारटक्केंचे गट एकमेकांना भिडले.

तर आमदार प्रताप सरनाईकांच्या गटातील माणसांनी बारटक्केंचा ट्रक तोडला असल्याचा आरोप बारटक्कें गटाने केला आहे. दरम्यान हा वाद आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारी पोहणार का असा सवाल निर्माण झाला आहे.

दरम्यान लोकमान्यनगर भागात माजी नगरसेवक बारटक्के हे प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांच्यासोबत एकाच प्रभागात नगरसेवक होते. बारटक्के हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. तर आमदार सरनाईक आणि बारटक्के यांच्यामध्ये पहिल्या पासूनच मतभेद असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

Pune Crime : तळलेल्‍या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर; ‘एफडीए’ ची ५ ठिकाणी धाड, १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त

Jalana Viral Video: दागिन्यावर डोळा, गावकऱ्यांनी भोंदूबाबाला दिला चांगलाच चोप, काय घडलं?

समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजच्या परिसरात छोट्या विमानाच्या गिरट्या; नेमकं काय घडलं? चर्चांना उधाण...

Satana Suspicious Case : मध्यरात्रीच्या संशयास्पद विधीने खळबळ; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल, तपास वेगात

SCROLL FOR NEXT