प्रस्थापितांना धक्का देत BRS पक्षानं महाराष्ट्रात उधळला विजयाचा गुलाल; या निवडणुकीत उघडलं खातं

K. Chandrashekar Rao News: राज्यातील विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकी अगोदर बीआरएस पक्षाला महाराष्ट्रात हात पाय पसरायचे आहे.
BRS K. Chandrashekar Rao News
BRS K. Chandrashekar Rao NewsESAKAL

मागील काही दिवसापासून बीआरएसच्या (भारत राष्ट्र समिती) महाराष्ट्रातील सभेनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर बीआरएस राज्यातील २८८ विधानसभा लढवणार आहेत. मात्र या आगोदर महाराष्ट्रात BRS ने खातं उघडलं आहे.

BRS K. Chandrashekar Rao News
Ajit Pawar : आमदारांचे प्रश्न घेऊन पवारांनी चंद्रकांत पाटलांना धारेवर धरलं; म्हणाले, मुंबईला गेल्यावर...

गंगापूर तालुक्यातील आंबेलोहळ गावात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत बीआरएसचं उमेदवार विजयी झाला आहे. गफार सरदार पठाण असं बीआरएसच्या (BRS)विजयी उमेदवाराचं नाव आहे. महत्वाचं म्हणजे राज्यातील बीआरएस पक्षाचा हा पहिला विजय असल्याचं बोललं जात आहे.

राज्यातील विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकी अगोदर बीआरएस पक्षाला महाराष्ट्रात हात पाय पसरायचे आहे. त्यासाठी के.चंद्रशेखर राव यांच्याकडून प्रयत्न केले जात आहे. मागील काही दिवसांपुर्वी राज्यातील काही जिल्ह्यात जाहीर सभा देखील घेतल्या आहे.

तर या प्रशिक्षण शिबिरात पक्षाचे ध्येय धोरणे, प्रत्येक गावात शाखा, कोअर कमिटी स्थापना अभियान, महाराष्ट्रातील समस्या बद्दल चर्चा, शेतकरी समोरील संकटे अशा विविध प्रश्नांवर शिबिरात चर्चा होणार आहे. तर या शिबिराला आलेल्या शिबिरार्थींची राहण्याची व्यवस्था गुरुद्वारा इथल्या पंजाब भवन इथे करण्यात येणार आहे. Latest Marathi News

BRS K. Chandrashekar Rao News
Maharashtra Politics: जागावाटपावरून काँग्रेस-ठाकरे गटात मतभेद! राज्यातील ३ नेते हायकमांडला भेटणार

 BRS पक्षाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर 

बीआरएसच्या महाराष्ट्रातील सभांच्यानंतर राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबीराला तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव हे उपस्थित राहणार असल्याची माहिती माणिकराव कदम यांनी दिली आहे. Marathi Tajya Batmya

दरम्यान आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यात बीआरएसकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याच्या पक्षात हालचाली सुरु आहेत. तसेच नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरात आगामी निवडणुकांचा मुद्दा महत्वाचा असणार आहे.

तर या प्रशिक्षण शिबिरात पक्षाचे ध्येय धोरणे, प्रत्येक गावात शाखा, कोअर कमिटी स्थापना अभियान, महाराष्ट्रातील समस्या बद्दल चर्चा, शेतकरी समोरील संकटे अशा विविध प्रश्नांवर शिबिरात चर्चा होणार आहे. तर या शिबिराला आलेल्या शिबिरार्थींची राहण्याची व्यवस्था गुरुद्वारा इथल्या पंजाब भवन इथे करण्यात येणार आहे. Latest Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com