M.R. Shah esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena Case: हेच ते न्यायाधीश ज्यांच्यामुळे ठाकरे-शिंदे सत्तासंघर्षाचा निकाल आज लागतोय

रुपेश नामदास

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा युक्तीवाद तब्बल 9 महिन्यांनंतर पुर्ण झाला. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनुसिंघवी आणि देवदत्त कामतांनी युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडून हरिश साळवे, महेश जेठमलानी, नीरज कौल यांनी युक्तिवाद केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला होता. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिस्पर्धी गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर तब्बल ९ महिन्यांनंतर सुनावणी पुर्ण झाली यानंतर आज (गुरूवारी) निकाल लागणार आहे. मात्र या निकालावर कोणीही स्पष्टपणे सांगू शकत नाही की निकाल कसा लागेल. मात्र हा निकाल ज्यांच्यामुळे आज लागतोय ते म्हणजे एम.आर.शाह हे येत्या १५ तारखेला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे हा निकाल लागत आहे. मात्र एम.आर.शाह यांच्या बद्दल माहिती जाणून घेवू.

न्यायमूर्ती एम.आर.शाह यांचं खरं नाव आहे. मुकेशकुमार रसिकभाई शाह. यांचा जन्म १६ मे १९९८ रोजी झाला. १९ जुलै १९७२ रोजी त्यांनी गुजरात विद्यापीठातून एलएलबी केली. त्यानंतर त्यांनी २० वर्षे गुजरात उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली. न्यायमूर्ती शाह यांनी केंद्र सरकारसाठी अतिरिक्त स्थायी वकील म्हणून काम केले आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरोचे वकील म्हणून ते कायम राहिले.

2004 मध्ये, न्यायमूर्ती एम.आर.शाह यांची गुजरात उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. जून 2005 मध्ये ते गुजरात उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश बनले. त्यांची पाटणा उच्च न्यायालयात बदली झाली आणि त्यांनी 12 ऑगस्ट 2018 रोजी मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. न्यायमूर्ती शाह यांची 2 नोव्हेंबर 2018 रोजी SC मध्ये नियुक्ती करण्यात आली. 15 मे 2023 रोजी चार वर्षांहून अधिक काळ सेवा केल्यानंतर ते निवृत्त होणार आहेत.

शाह यांचा कार्यकाळ

पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्या

12 ऑगस्ट 2018

गुजरात उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश

22 जून 2005 - 11 ऑगस्ट 2018

गुजरात उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्या

7 मार्च 2004 - 21 जून 2005

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : तुळजाभवानी देवीच्या 4 हजार एकर इनामी जमीन घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश

Kolhapur Crime : एक कोटी दे, मग बांधकाम कर; बिल्डरचं अपहरण, संशयिताने लढवलेली महापालिकेची निवडणूक

SCROLL FOR NEXT