CM Eknath Shinde with Devendra Fadnavis  esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena : शिंदे गटाने सोडला सुटकेचा निःश्वास; फटाके फोडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहिर होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नगरसेवक, आमदार, खासदारांसह पदाधिका-यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. शिंदे यांच्या पक्षाच्या मुंबईतील कार्यालयांमध्ये निकालानंतर फटाके फोडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले. वर्षा बंगल्यावर पेढे वाटण्यात आहे. मुंबईतील भाजपा कार्यालयांमध्येही आज निकालानंतर आनंदाचे वातावरण होते.

सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सत्ता बदल होणार शिंदे सरकार कायम राहणार याबाबत कमालिची उत्सूकता निर्माण झाली होती. कालपासून सर्वांचे डोळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले होते. आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे वाचन सुरू झाले आणि शिंदे सरकारचे प्रतोद आणि राज्यपालांची भुमिका यावर न्यायालयाने ताशेरे मारले.

त्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता तर आम्ही ठाकरे यांची मुख्यमंत्री पदी नियुक्ती केली असती, असा निष्कर्ष नोंदवून न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा दिला. त्यानंतर मुंबईतील शिंदे गटाच्या कार्यालयांच्या आवारात फटाके फोडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.

शिंदे गटातील आमदार, खासदार आणि नगरसेवकांच्या कार्यालयात पेढे वाटून जल्लोष केला. मुंबईतील भाजपा कार्यालयांमध्येही आज निकालानंतर आनंदाचे वातावरण होते. भाजपा आणि शिंदे गटाने आज सुटकेचा निःश्वास सोडल्याचे दिसून आले.

महाविकास आघाडीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले असले तरी या निर्णयानंतर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात निरूत्साह होता. त्यांना अपेक्षित असलेला निकाल लागला नसल्याने त्यांची निराशा झाल्याचे दिसून आले.

न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून मुंबईत कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिंदे गटाची कार्यालयो तसेच शिवसेनेच्या शाखांच्या ठिकाणी बंदोबस्त वाढविला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

SCROLL FOR NEXT