Satara Jawan Vaibhav Bhoite Martyred esakal
महाराष्ट्र बातम्या

लडाखमध्ये मोठी दुर्घटना! लष्करी वाहन दरीत कोसळून 9 जवानांचा मृत्यू; महाराष्ट्राचा जवानही शहीद

10 जवानांसह लष्कराचे वाहन लेहहून न्योमाकडं जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ते वाहन काल दुपारी 4.45 वाजता दरीत कोसळलं.

राहुल लेंभे

यात महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील जवानही शहीद झाल्याची माहिती मिळत आहे.

Soldier Accident Ladakh : लडाखमधील (Ladakh) लेह जिल्ह्यात लष्कराचं वाहन रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळलं. यामुळं 9 जवान ठार झाले आणि 1 गंभीररित्या जखमी झाला. हा अपघात दक्षिण लडाखच्या न्योमा येथील कियारी परिसरात झाला असल्याची माहिती लष्कर अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

यात महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील जवानही शहीद झाल्याची माहिती मिळत आहे. जवान वैभव भोईटे हे मूळ हिंगणगाव (ता. फलटण) येथील असून राजाळे (ता. फलटण) येथे स्थायिक असल्याची माहिती मिळत आहे. भोईटे हे या अपघातात शहीद झाले आहेत. वैभव भोईटे हे 311 आर्टिलरी रिजिमेंटमध्ये होते. त्यांच्या युनिटची पोस्टिंग लडाख इथं आहे. त्यांची पत्नी सातारा पोलीस दलात कार्यरत आहे.

लेहचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक पी. डी. नित्या यांनी सांगितले की, 10 जवानांसह लष्कराचे वाहन लेहहून न्योमाकडं जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ते वाहन दुपारी 4.45 वाजता दरीत कोसळलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Satara Jawan Vaibhav Bhoite Martyred

लडाखमधील लेहजवळ झालेल्या अपघातात भारतीय लष्कराचे जवान शहीद झाल्यामुळं दु:ख झाले आहे. त्यांनी आमच्या देशासाठी केलेलं बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही. माझ्या शोक संवेदना त्यांच्या शोकाकूल कुटुंबीयांसोबत आहेत, अशी भावना त्यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे.

जखमी जवानांना तातडीनं फिल्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर तात्काळ उपचार होऊन ते लवकर बरे व्हावेत यासाठी संरक्षण मंत्र्यांनी प्रार्थनाही केली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या जवानावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : दिल्लीतील मद्य घोटाळ्याच्या आरोपातून निर्दोष मुक्ततेनंतर अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर; म्हणाले- सत्याचाच विजय झाला

Satej Patil Hasan Mushrif Vinay Kore Alliance : सतेज पाटील, मुश्रीफ, विनय कोरे एकत्र येणार?, झेडपीतील पाडापाडीमुळे ‘गोकुळ’च्या राजकारणाला उकळी

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये ४०० कोटींच्या कथित अपहरण प्रकरणात मोठी घडामोड

प्रतीक्षा संपली ! स्टार प्लसचा बहुप्रतीक्षित शो "तारा" १० मार्चपासून रात्री ८ वाजता येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Ramdas Athawale: मोदींचा सामना करणे ‘बच्चों का खेल नहीं’; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राहुल गांधी यांना चिमटा

SCROLL FOR NEXT