महाराष्ट्र

इतरत्र हॉटेलवर बस थांबविल्यास वाहक-चालकाला 500 रुपये दंड

नरेंद्र जोशी

नाशिक : पाच तास प्रवास केल्यानंतर चहा, नाश्‍ता यासाठी एक अधीकृत थांबा राज्य परिवहन महामंडळाने मंजूर केला असून, तो अधिकृत थांबा सोडून इतरत्र बसेस थांबविणाऱ्या बसचालक व वाहकांना प्रत्येक पाचशे रुपये दंड करण्याचे आदेश एसटी महामंडळाने दिले आहेत. 

एसटी महामंडळाच्या बसथांब्याव्यतिरीक्त महामंडळाने उत्पन्नाचे साधन म्हणून पाच तासांच्या प्रवासात एक हॉटेल अधिकृत थांबा म्हणून मंजूर केले आहे. अधिकृत थांब्यावर बस थांबत असल्याने संबंधित हॉटेलचालकांनाही 24 तास हक्काचे ग्राहक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र ही सेवा देत असताना प्रवशांसह चालक व वाहकांची मर्जीही सांभाळावी लागते. त्यात कमतरता झाली की चालक- वाहक आणि प्रवाशीही अधिकृत थांबा सोडून इतरत्र बस थांबवून सोय करू लागतात, बस थांबत नाही.

असे लक्षात आल्यानंतर हॉटेलचालक तक्रारी करू लागतात. त्यानंतर एसटीचे दक्षता पथक अनधिकृत थांब्यावर लक्ष्य ठेवतात. नको त्या ठिकाणी बस थांबताच दंड करून अहवाल पाठवतात. आता तीन महिन्यांत किती जणांना दंड झाला, याचा अहवाल विभाग नियंत्रकांना सादर करावा लागणार आहे. 

"प्रत्येक वेळी चालक- वाहकांची चूक असते, असे नाही. प्रवाशांना अधिकृत थांब्यावर चांगली सेवा मिळाली नाही. दर चढे असले की तेच तक्रारी करतात व इतर अनधिकृत थांब्यावर बस उभी करण्यास भाग पाडतात. अशावेळी वाहक- चालकांना त्यांची मर्जी सांभाळावी लागते. त्यामुळे दंड करताना चालक व वाहकांचा त्या मागील हेतूही समजून घेतला पाहिजे. विनाकारण बळीचा बकरा करण्यात अर्थ नाही.'' 

- प्रमोद भालेकर, विभागीय सचिव, एसटी कामगार संघटना 

आकडे बोलतात 

बस : 18 हजार 
अधिकारी- कर्मचारी संख्या : एक लाख चार हजार 
चालक व वाहक : सत्तर हजार 
अधिकृत थांबा उत्पन्न 
दहा कोटी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Health Care : भरपूर खाऊनदेखील भूक लागते? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

CSK vs SRH : बाळ येतंय, मॅच लवकर संपव...! SRH विरुद्धच्या सामन्यादरम्यान साक्षीने धोनीला का केली स्पेशल रिक्वेस्ट?

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

SCROLL FOR NEXT