Paricharika 
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! राज्यातील परिचारिकांचे राज्यव्यापी आंदोलन; "या' आहेत मागण्या

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोना महामारीमध्ये मागील पाच महिन्यांपासून परिचारिका जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा करीत आहेत. परिचारिकांना "फ्रंटलाइन योद्धे' असे संबोधून जगभर त्यांचे कौतुक केले जात आहे. मात्र, शाब्दिक कौतुक नको म्हणत विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे मंगळवारीपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 

प्रमुख मागण्या "या' आहेत... 

  • परिचारिकांची खूप पदे रिक्त असून सरकारने तात्पुरती नव्हे तर कायमची भरती प्रक्रिया राबवावी. 
  • ​परिचारिकांच्या पदभरतीसाठी शासनाने परवानगी दिली असतानाही प्रत्यक्षात पदभरती झालेली नाही. सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देऊन रिक्त पदे कायमस्वरूपी भरण्यात यावीत. 
  • कोरोना कक्षात रोटेशन करताना मनुष्यबळ अपुरे पडत आहे. रुग्णसंख्या जास्त असल्यामुळे परिचारिकांवर प्रचंड मानसिक ताण येतो आहे. सात दिवस रोटेशन व तीन दिवस क्वारंटाईन, त्या आठवड्याची साप्ताहिक सुटीही मिळत नाही. हा प्रकार परिचारिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व सामाजिकदृष्ट्या घातक आहे. आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कोव्हिड-19 विषाणूचा अधिशयन काळ हा 14 दिवसांचा आहे. या निर्णयामुळे इतर नॉनकोव्हिड रुग्णांनाही संसर्ग होऊ शकतो. तसेच परिचारिका आजारी पडण्याचे प्रमाण वाढेल व आधीच अपुरे असलेले मनुष्यबळ आणखी कमी होईल. त्यामुळे सात दिवस रोटेशन व सात दिवस क्वारंटाईन हा क्रम कायम ठेवावा. 
  • परिचारिकांसाठी प्रोटीनयुक्त आहार व चांगल्या दर्जाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. 
  • केंद्र शासनाप्रमाणे राज्य सरकारने जोखीम भत्ता नव्याने मंजूर करून द्यावा. 
  • ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील अधिपरिचारिका अरिफा शेख यांचे वैयक्तिक आकसापोटी नियमबाह्य निलंबन करण्यात आले. त्यामुळे त्यांना प्रचंड वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. न्यायालयाने त्यांचे निलंबन नियमबाह्य ठरवून, त्यांना पुन्हा कर्तव्यावर हजर करून घेण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर अधिकाराचा गैरवापर करून परिचारिकांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर विनाविलंब कडक कार्यवाही करण्यात यावी. 
  • राज्यातील परिचारिकांना फक्त रुग्णसेवेचीच कामे द्यावीत 
  • ग्रामीण रुग्णालय स्तरावर मासिक अहवाल तयार करणे, डाटा एन्ट्री ही कारकुनाची कामे काढून घ्यावीत 
  • केंद्र शासनाने परिचारिकांचे पदनाम बदलले आहे. राज्य शासनानेही तसा बदल करून परिचारिकांना प्रोत्साहन द्यावे. 

25 जिल्ह्यांमध्ये आंदोलनास प्रतिसाद 
रुग्णसेवा विस्कळित न करता काळ्या फिती लावून 1 सप्टेंबरपासून आंदोलन सुरू केले आहे. राज्यभर 25 पेक्षा जास्त जिल्ह्यांतून या आंदोलनास प्रतिसाद मिळाला आहे. या आंदोलनास राज्यातील विविध क्षेत्रातील 13 संघटनांनी पाठिंबा दर्शवला. दरम्यान, 8 सप्टेंबरला एक दिवस कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतरही मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. परिचारिका संघटनेच्या राज्याध्यक्ष मनीषा शिंदे, राज्य सचिवा सुमित्रा तोटे, उपाध्यक्ष भीमराव चक्रे, शाहजाद खान, मंगला ठाकरे, हेमलता गजबे, अजित वसावे, राज्य कार्याध्यक्ष अरुण कदम, राम सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन हाती घेण्यात आले असून आता सरकार यावर कसा मार्ग काढणार, याकडे लक्ष लागले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Drop India : आनंद वार्ता! सोने दरात आणखी घसरण होणार, युद्धामुळे अनेक जहाज दुबईत अडकून; ग्राहकांना मोठा दिलासा

T20 WC, IND vs NZ, Final: फायनलसाठी भारतीय संघात होणार मोठा बदल; सूर्यकुमार अन् गंभीर हुकमी एक्का असलेल्या खेळाडूला देणार संधी?

Nagpur doctor arrested: मक्केत नागपूरच्या डॉक्टर-इंजिनिअरला अटक! नमाजदरम्यान घडले नेमके काय? भाषेच्या गैरसमजाने वाढली अडचण

Iran–US War Escalation : ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने दुबईसह अनेक ठिकाणी हल्ले वाढवले, अनेक देशांत मंदीची शक्यता

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नोएल टाटा यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला दिली भेट

SCROLL FOR NEXT