Rain
Rain 
महाराष्ट्र

‘ऑक्‍टोबर हीट’चा चटका; राज्यात गुरुवारपासून वादळी पाऊस

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुण्यासह राज्यातील बहुतांश भागांमध्ये गेले दोन दिवस वादळी पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. पावसाची उघडीप होताच ‘ऑक्‍टोबर हीट’चा चटका वाढला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान रत्नागिरी येथे ३६.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. दरम्यान, राज्याच्या काही भागांतून मॉन्सून परतला असतानाच गुरुवार (ता. १७) पासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अनेक भागांत पाऊस थांबला आहे. मात्र, काही ठिकाणी दुपारनंतर ढग जमा होऊन सायंकाळी हलक्‍या ते मध्यम सरी पडत आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर अनेक ठिकाणी तापमान ३० ते ३४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. 

पुण्यात उद्या बरसणार
पुणे शहर आणि परिसरात बुधवारी (ता. १६) पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. रविवार (ता. २०) पर्यंत पाऊस पडण्याची शक्‍यता ५१ ते ७५ टक्के असल्याचे स्पष्ट केले. शहरात ८४ टक्के आर्द्रता असून, उन्हाचा चटका वाढल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

SCROLL FOR NEXT