Supriya Sule on Jitendra Awhad Statement | Supriya sule news sakal
महाराष्ट्र बातम्या

'आव्हाड भावूक नेते, त्यांच्या मुलीला...', सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मेहुण्यावर ईडीने कारवाई केली आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मेहुण्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्यांच्या कंपनीच्या ११ सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. हा दडपशाही करण्याचा प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या. भाजप केंद्राच्या यंत्रणा वापरून विरोधी पक्षाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

एकत्रित येऊन देशासाठी काही करण्याऐवजी केंद्र सरकार सुडाचे राजकारण करत आहे, हे दुर्दैव्य आहे, अशा सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या. महागाई सारख्या मुद्द्यांवरुन लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्या म्हणाल्या. (Supriya Sule on Jitendra Awhad Statement)

केंद्रीया यंत्रणा स्वायत्त राहल्या नाही. केंद्रीय तपास यंत्रणाचे छापे सिलेक्टीव आहेत. भाजप सोबत राहीले तर आपण क्लीन असतो आणि जर विरोधात राहले तर आपण डर्टी असतो, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला.

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ईडीच्या कारवाईसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की नुसतं चौकशीला बोलवलं तरी, माझी मुलगी आत्महत्या करेल. यावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, "जितेंद्र आव्हाड भावनिक आहेत. मी समजू शकते अशा गोष्टींच्या एका वडिलाला काय वेदना होतात. कुटूंबावर आरोप प्रत्यारोप करण्याची कधीच महाराष्ट्राच्या राजकारणात पध्दत नव्हती. हे सर्व दुर्दैवी आहे." शरद पवार हे ५५ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात, आजपर्यंत त्यांनी कुणावर कोणतेही आरोप केलेला नाही, असे ही त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime: भोगावच्या सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर छापा! पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई; २६ ग्राहकांसह १५ बारबाला आढळल्या

Marathi News Live Updates : पुण्यात आज MPSC विद्यार्थ्यांचा मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Pune News: अतिउच्चदाब वीज वाहिनीत स्फोट, 3 लाखांवर ग्राहकांचा वीज खंडित; PMPच्या ७० बसची सेवा ठप्प, ८ मेट्रोगाड्या २२ मिनिटं जागेवरच थांबल्या

Nepal Flood: १० दिवस ढिगाऱ्याखाली, तरीही जीवंत! नेपाळमध्ये ६० वर्षीय महिलेची थरारक सुटका

Pune Railway: पुणेकरांसाठी गणेशोत्सवाची रेल्वे भेट! कोकणवासीय प्रवाशांची सोय, पुणे-रत्नागिरी मार्गावर सहा फेऱ्या

SCROLL FOR NEXT