वाजपेयींची मोठी भीती भाजप सरकारमध्येच खरी ठरली : महुआ मोइत्रा

Mahua Moitra Criticized BJP over Vajpayee Statement
Mahua Moitra Criticized BJP over Vajpayee Statemente sakal

नवी दिल्ली : भाजप सरकारने संसदेचे रुपांतर रोमच्या कोलोसियममध्ये केले आहे. संसदेमध्ये 'मोदी-मोदी' असे नारे लावले जातात. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची सर्वात मोठी भीती त्यांच्याच पक्षाच्या सरकारमध्ये खरी ठरली, असा निशाणा तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा (Mahua Moitra) यांनी लोकसभेत साधला.

Mahua Moitra Criticized BJP over Vajpayee Statement
'गोबर रिपब्लिक'मध्ये राहता, महुआ मोईत्रा शिक्षण धोरणावर संतापल्या

उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये भाजपच्या दणदणीत विजयानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपच्या (BJP) खासदारांनी 'मोदी-मोदी' असे नारे लावले. त्यावरून मोहुआ मोइत्रा यांनी टीका केली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी १९७२ मध्ये संसदेत केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत महुआ मोइत्रा म्हणाल्या, ''आजकाल नवी दिल्लीतील वातावरणात गुदमरल्यासारखं होते. इथं मोकळा श्वास घेणे शक्य नाही. ऑल इंडिया रेडिओवर सकाळपासून रात्रीपर्यंत पंतप्रधानांच्या नावाचा जप केला जातो. चित्रपट दाखवताना पडद्यावर प्रचार केला जातो. विरोधी पक्षनेते लोक कसे लढणार? असं वाजपेयी म्हणाले होते. वाजपेयींची सर्वात मोठी भीती आज त्यांच्याच पक्षाच्या सरकारमध्ये खरी ठरली आहे. आज वाजपेयींचा पक्ष संसदेला रोमच्या कोलासिमयसारखे बनवत आहे. संसदेत 'मोदी मोदी' नावाचा जप केला जातो. ही भारतातील सर्वात मोठी शोकांतिका आहे.''

वाजपेयी नेमकं काय म्हणाले होते? -

''निवडणूक निकालानंतर पंतप्रधानांच्या हातात अपदवादात्मक शक्ती आणि अधिकार दिले आहेत. सर्व सत्ता नवी दिल्लीत केंद्रीत झाली आहे. केंद्रीय मंत्री दिल्लीतील दरबारी बनले आहेत. सचिवालय एक समांतर मंत्रिमंडळ बनले आहे. पंतप्रधान सर्वश्रेष्ठ आहेत आणि इतर त्यांच्या पायाशी लोळण घालतायत. एखादा व्यक्ती हुकूमशहा होत असल्याची ही धोकादायक परिस्थिती आहे का?'' असा सवाल वाजपेयींनी उपस्तित केला होता. ''सध्या नवी दिल्लीतील वातावरणात गुदरमल्यासारखं होतं. इथं मोकळा श्वास घेणे सोपे नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत आकाशवाणीवर पंतप्रधानांच्या नावाचा जप, सिनेमाच्या पडद्यावरचा प्रचार. यामध्ये विरोधी पक्षात बसलेले लोक कसे लढणार?'' असा सवाल वाजपेयींनी उपस्थित केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com