Loksabha Election Sambhajiraje Chhatrapati
Loksabha Election Sambhajiraje Chhatrapati esakal
महाराष्ट्र

Loksabha Election : '2009 च्या निवडणुकीत झालेली जखम मी अजून विसरलेलो नाही'; संभाजीराजेंचं कोणाला उद्देशून वक्तव्य?

सकाळ डिजिटल टीम

लोकसभेच्या निवडणुकीत आमची स्वराज्य संघटना मुख्य प्रवाहात असेल याविषयी दुमत नाही. पण आम्ही किती जागा लढवणार हे स्पष्ट नाही.

कोल्हापूर : ‘लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीत झालेली जखम मी अजून विसरलेलो नाही, त्याला मी वार समजत नाही कारण आमच्यावर कोणी वार करू शकत नाही. आमची स्वराज्य संघटना (Swaraj Sanghatana) लोकसभेच्या मुख्य प्रवाहातच असेल’, असे सांगत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी आगामी लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढवण्याचे संकेत दिले.

काँग्रेस नेते आमदार पी. एन. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. कोल्हापुरातून लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा ‘सरप्राईज’ चेहरा असेल, असे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी सांगितले होते. याबाबत बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, ‘लोकसभेच्या निवडणुकीत आमची स्वराज्य संघटना मुख्य प्रवाहात असेल याविषयी दुमत नाही. पण आम्ही किती जागा लढवणार हे स्पष्ट नाही. कोल्हापूर, नाशिक की अन्य कोणत्या मतदारसंघातून लढायचे हे सुध्दा वेळच ठरवेल. जे कोणी जास्त प्रेम देतील तिथून संभाजीराजे निवडणूक लढवतील. त्यासाठी चर्चेचे दरवाजे खुले आहेत.’

मनोज जरांगे-पाटील आणि छगन भुजबळ यांच्या वादावर बोलताना ते म्हणाले, ‘या दोघांनाही मी सबुरीचा सल्ला दिला आहे. समाजात राहत असताना दोघांनीही सुखाने राहिले पाहिजे. दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी लोकप्रतिनिधींनी त्याची काळजी घेतली पाहिजे. मराठा आरक्षणाबाबत डिसेंबरमध्ये मी महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठक घेतली होती. या बैठकीची दखल केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली नाही, तर आमच्याशी गाठ आहे. आम्ही प्रसंगी थंडीत दिल्लीत ठाण मांडून बसू.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT