Maharashtra Police
Maharashtra Police esakal
महाराष्ट्र

राज्यभरातील नऊ पोलिस उपायुक्तांच्या पदस्थापनेला तात्पुरती स्थगिती

सकाळ वृत्तसेवा

राज्य सरकारच्या गृह विभागाने सोमवारी सायंकाळी 109 पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश काढले होते.

पुणे - राज्य सरकारच्या गृह विभागाने सोमवारी सायंकाळी 109 पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बदली झालेल्या अधिकाऱ्यांपैकी त्यापैकी 9 जणांच्या पदस्थापनेला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली.

गृह विभागाचे (आस्थापना) अतिरीक्त पोलिस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी याबाबत मंगळवारी आदेश काढले. त्यामध्ये पुणे शहर पोलिस दलातील परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांच्यासह प्रशांत मोहिते, संदिप डोईफोडे, दिपक देवराज, सुनील लोखंडे, प्रकाश गायकवाड, तिरुपती काकडे, योगेश चव्हाण, शर्मिष्ठा घार्गे (वालावलकर) या पोलिस अधिकाऱ्यांची नावे वगळून इतर अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे व नव्या ठिकाणी रुजु होण्याबाबत आदेश दिला आहे. नम्रता पाटील यांचा कार्यकाळ पुर्ण झाला असून सोमवारी आलेल्या आदेशामध्ये त्यांना मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती देण्यात आली होती. संबंधित 9 अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत लवकरच नव्याने आदेश निघण्याची शक्‍यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Terrorist Attack: 5-6 गोळ्या चालवायचे थांबायचे अन् पुन्हा...; जम्मू बस अटॅकमध्ये जखमींनी सांगितली आपबिती

Ind vs Pak : सामन्यात टळली मोठी दुर्घटना! सिराजच्या 'त्या' बॉलवर थोडक्यात वाचला मोहम्मद रिझवान; डोक्यात...

Latest Marathi News Live Update : लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे ॲक्शन मोडवर

Sonakshi Sinha Wedding : शत्रुघ्न सिन्हा यांची लेक 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात; सोनाक्षीच्या लव्हस्टोरीसाठी सलमान कारणीभूत

IRCTC Password Recovery : IRCTC पासवर्ड विसरलात? चिंता करू नका, 'या' दोन सोप्या मार्गांनी करा रिकव्हर

SCROLL FOR NEXT