Latest Marathi News Live Update : एका क्लिकवर वाचा, दिवसभरातील घडोमोडी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal

PM Modi: पंतप्रधान मोदींचा मनमोहन सिंह, प्रतिभा पाटील यांना फोन, तिसऱ्या कार्यकाळासाठी मागितल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना फोन करत तिसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा मागितल्या.

Sikkim CM: सिक्कीमच्या नव्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांकडून शुभेच्छा

सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पी एस तमांग गोले यांचे अभिनंदन. त्यांना फलदायी कार्यकाळासाठी शुभेच्छा. सिक्कीमच्या प्रगतीसाठी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत.

Nepal: नेपाळच्या पंतप्रधानांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

राष्ट्रपती भवन येथे भारताचे राज्य पाहुणे नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेतली.

आम्ही काल दिल्लीत होतो, कुठेही मतभेद नाहीत - अजित पवार

आम्ही काल दिल्लीत होतो, कुठेही मतभेद नाहीत. माध्यमांतून काहीही बातम्या लागल्या. फडणवीस यांनीही वस्तुस्थिती सांगितली. त्यांनी सांगितलं राज्यमंत्री स्वतंत्र कारभार हे पद दिलं जाईल, पण आमच्याकडून प्रफुल्ल पटेल आहेत, ते कँबिनेट‌ मध्ये राहिलेत, तेव्हा आम्ही सांगितलं ‌आम्ही पद स्वीकारणार नाहीत. आम्ही एनडीएतच राहू, जुलैपर्यंत आपले राज्यसभेत तीन सदस्य होतील असे अजित पवार यांनी सांगितले

थोड्याच वेळात होणार मोदींच्या मंत्रिमंडळाची पहिली कॅबिनेट बैठक

नवी दिल्ली : थोड्याच वेळात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार असून मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मंत्री दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी ही बैठक होत असून केंद्रीय मंत्री अमित शाह, शिवराज सिंग चौहान, गिरिराज सिंग, एस जयशंकर बैठकीसाठी पोहोचले आहेत.

Maharashtra Weather : पुढील तीन तासांत राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता

राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यादरम्यान येत्या काही तासांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पुढील तीन तासात विजांसह पावसाची शक्यता असलेले जिल्हे: लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, बीड, जालना, हिंगोली, छ. संभाजीनगर | वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा | सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर | रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड

पुण्यात महापालिका प्रशासानाविरोधात मनसेचं आंदोलन

पहिल्याच पावसात पुणे शहरात रस्त्यावर पाणी साचल्याचे पाहायला मिळाले होते. रस्ते तुंबल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यानंतर मनसेकडून आंदोलन करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला जात आहे.

Sunil Tatkare : '2004 साली मुख्यमंत्री पद घेतलं असतं तर आता परिस्थिती वेगळी असती'

२००४ साली मुख्यमंत्री पद घेतलं असतं तर आता परिस्थिती वेगळी असती. २०१४ साली आम्ही भाजपला बाहेरुन ‌पाठिंबा दिला, तेव्हापासूनच सुरुवात झाली होती भाजपबरोबर जायची, असा गौप्यस्फोट खासदार सुनील तटकरे यांनी केला. २००९ साली शिवसेनेबरोबर जायचा प्रयत्न झाला. २०१४ सालीसुद्धा सेना १६, भाजप १६ राष्ट्रवादी १६ असा फॉर्म्युला ठरला होता, पण ते पुढं गेलं नाही, असेही त्यांनी सांगितले.

..अखेर यल्लमा मंदिराजवळचा 400 वर्षापूर्वींचा जुना वटवृक्ष उन्मळून पडला!

रत्नागिरी-नागपूर हायवेच्या कामादरम्यान भोसे यल्लमा मंदिरानजीकचा (ता. मिरज, जिल्हा सांगली) वृक्ष वाचविण्यासाठी जनआंदोलन झाले होते. या जनआंदोलनात सकाळ आंदोलकांच्या साथीला होता. हा वृक्ष वाचविण्यात बातम्यांचे कव्हरेज सकाळने दिले होते. आंदोलनाची दखल घेत तत्कालीन पर्यावरण मंत्री मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना विनंती करत हा वृक्ष वाचविण्याचे आवाहन केले होते. त्यांनीही प्रतिसाद देत हा वृक्ष वाचविला. पण, प्रशासनाकडून वृक्ष वाचवताना एका बाजूच्या फांद्या तोडल्या गेल्या त्यामुळे वटवृक्ष, त्याच्या खालची जमीन थोडीशी ढिली झाली, वृक्षाचा बोजा एका बाजूला झाला. त्याचा परिणाम म्हणजे आज हा वृक्ष पावसाने उन्मळून पडला. त्याबरोबरच 400 वर्षाच्या इतिहासाचा साक्षीदार अखेर इतिहास जमा झाला, अशी माहिती ज्ञानदेव मासाळ यांनी दिली.

Sheikh Hasina : काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची दिल्लीत भेट

दिल्ली : काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी आज दुपारी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची दिल्लीत भेट घेतली.

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाला सकल मराठा समाजाचा कोल्हापुरातून पाठिंबा

कोल्हापूर : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगेसोयरेच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला कोल्हापुरातून सकल मराठा समाजाकडून पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. सकल मराठा समाजाकडून आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकस्थळी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी या निदर्शनामध्ये सहभागी झाले होते. 

Eknath Shinde : 'कोस्टल रोडचा दुसरा बोगदा खुला, प्रवासाचा वेळ 40-50 मिनिटांवरून 8 मिनिटांपर्यंत कमी होणार'

"आज धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडचा दुसरा टप्पा खुला करण्यात आला आहे. हाजी अली आणि अमरसन्सपासून हा बोगदा 6.25 किमी लांबीचा आहे. जुलै महिन्यात हा वरळीपर्यंत खुला होईल. त्याचबरोबर प्रगत तंत्रज्ञान या बोगद्याच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला प्रवासाचा वेळ 40-50 मिनिटांवरून 8 मिनिटांपर्यंत कमी होईल, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

CM N Biren Singh : मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या ताफ्यावर हल्ला, एक सुरक्षा कर्मचारी जखमी

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या ताफ्यावर सोमवारी कांगपोकपी जिल्ह्यात सशस्त्र जमावानं हल्ला केला, ज्यात एक सुरक्षा कर्मचारी जखमी झाला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 10.30 च्या सुमारास हा ताफा इंफाळहून जिरीबाम जिल्ह्यात जात असताना राष्ट्रीय महामार्ग-37 वर हल्ला झाल्याची माहिती आहे.

10th Exam : दहावीच्या पुरवणी परीक्षेला १४ जूनपासून सुरुवात होणार

बेळगाव : दहावीच्या पुरवणी परीक्षेला १४ जूनपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने परीक्षेची तयारी सुरू केली असून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील ३३ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार असून, बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील ११०६५ विद्यार्थी पुरवणी परीक्षा देणार आहेत.

Eknath Shinde : कोल्हापुरात मुख्यमंत्री शिंदेंना डिवचणारा बॅनर, शहरभरात जोरदार चर्चा

कोल्हापुरात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचणारा बॅनर चर्चेचा ठरत आहे. या बॅनरवरती काॅंग्रेस नेते सतेज पाटील यांचा फोटो असून 'आता कशी वाजवली घंटी' असा उल्लेख आहे. त्यामुळे बॅनरबाबत शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.

Reasi Terror Attack : ..तर आपल्याला पाकिस्तानशी युद्ध सुरू करावे लागेल - रामदास आठवले

दिल्ली : रियासी दहशतवादी हल्ल्याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, "मला विश्वास आहे की जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद संपला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार बनवताना भीती निर्माण करण्यासाठी हा हल्ला जाणीवपूर्वक करण्यात आला. पण, जर अशा घटना घडत राहिल्या तर आपल्याला पाकिस्तानशी युद्ध सुरू करावे लागेल.'

NEET-UG: संभाजीनगरमध्ये नीट-यूजीमधील गोंधळाप्रकरणी विद्यार्थ्यांचे मूक आंदोलन

संभाजीनगरमध्ये नीट-यूजी परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळाच्या निषेधात विद्यार्थ्यांनी मूक आंदोलन सुरु केले आहे. फेरपरीक्षा घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Costal Road: कोस्टल रोडच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिंदे दाखल

कोस्टल रोडच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दाखल झाले आहेत. कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याचा आज शुभारंभ करण्यात येणार आहे.

Shahu Maharaj Chhatrapati : खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट

कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी आज विजयानंतर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी शाहू महाराज यांचे छोटे चिरंजीव मालोजीराजे छत्रपती, तसंच काँग्रेस आमदार सतेज पाटील उपस्थित होते.

AJit Pawar: अजित पवार कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी दाखल

अजित पवार कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहेत. कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आज खुला केला जाणार आहे.

By-elections: अनेक राज्यांच्या विधानसभा पोट निवडणूक जाहीर

अनेक राज्यांच्या विधानसभा पोट निवडणूक जाहीर करण्यात आल्या आहेत. सात राज्यांमध्ये तेरा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. 10 जुलैला पोटनिवडणूकसाठी मतदान होईल बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेशात होणार विधानसभा पोट निवडणूक होणार आहेत. 13 जुलैला मतमोजणी होईल.

Sri Lanka President Ranil Wickremesinghe : एस. जयशंकर यांनी दिल्लीत घेतली श्रीलंकेच्या अध्यक्षांची भेट

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज दिल्लीत श्रीलंकेचे अध्यक्ष रनील विक्रमसिंगे यांची भेट घेतली. विक्रमसिंगे हे मोदींच्या शपथविधीसाठी भारतात आले होते.

Parliament Session News Live: 18 जून पासून संसदेचे अधिवेशन सुरू होण्याची शक्यता

18 जून पासून संसदेचे अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार आहे. हे विशेष अधिवेशन असेल तर पावसाळी अधिवेशन पुढच्या महिन्यात होईल अशी शक्यता आहे.

Accident News Live: दौंडमध्ये गार पुलाचे खांब कोसळले, कोणतीही जीवितहानी नाही

पुणे आणि नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या दौंड-गार गावादरम्यान नव्याने होत असलेल्या भीमा नदीवरील पुलाचे खांब कोसळल्याची घटना घडली आहे. निकृष्ट दर्जाचे काम केल्याने पुलाचे खांब कोसळले असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. आज भीमा नदीला पाणी आल्याने पुलाचे खांब कोसळले आहेत. सुदैवाने याच्यामध्ये कोणती जीवितहानी झाली नाही.

PM Modi Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारला पदभार; काम सुरू करताच शेतकऱ्यांना दिलं अनुदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारला. काम सुरू करताच त्यांनी शेतकऱ्यांना 20 हजार कोटींच अनुदान दिलं आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान टाकलं आहे.

Amol Mitkari Live: 'दस्तुरखुद्द विजय वडेट्टीवारचं भाजपच्या वाटेवर..!', अमोल मिटकरींची पोस्ट चर्चेत

दस्तुरखुद्द विजय वडेट्टीवारचं भाजपच्या वाटेवर..! अशी एक पोस्ट सोशल मिडीयावर अमोल मिटकरींनी शेअर केली आहे.

Murlidhar Mohol Live: 'चिठ्ठी निघेल ते खात स्वीकारायचं आणि त्यात चांगल काम करायचं - मुरलीधर मोहोळ

हजारो लोकांसमोर भाषण करायचं सोप असत, पण काल दडपण होतं. विश्वास बसत नव्हता की मी मंत्री म्हणून शपथ घेत आहे. मी सामान्य कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणूनच काम करायचं आहे. काल माहीत नव्हत मंत्री म्हणून संधी मिळणार आहे. त्यामुळं खातं कोणतं मिळावं याची अजिबात काळजी नाही.

जी चिठ्ठी निघेल ते खातं स्वीकारायचं आणि त्यात चांगल काम करायचं. माझं लक्ष पुण्यावर आहे. पाऊस जास्त झाल्यामुळं पाणी साचलं. पुण्यात गेल्यावर आयुक्तांसोबत पहिली बैठक घेणार आहे.30 वर्ष पालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्ता होती त्यांनी काय केलं? त्यांना टीका करुद्या मी काम करत राहणार आहे.

Amit shah Live: CM योगी आदित्यनाथ पोहोचले अमित शहांच्या भेटीला, मोदी ३.० च्या स्थापनेनंतरची पहिली भेट

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अमित शाह यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. मोदी मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर सीएम योगी यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

Manoj Jarange Live:  जालन्याचे खासदार डॉ.  कल्याण काळे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट

डॉ. कल्याण काळे हे मनोज जरांगे पाटील यांना भेटणारे महाविकास आघाडीचे तिसरे खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर रात्रीच बीडचे खासदार बजरंग सोनवणे आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परभणीचे खासदार बंडु जाधव आणि आता जालनाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे हे उपोषण सुरू झाल्यानंतर आले आहेत. या सर्वांनी मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानले आहेत. शिवाय आता सुरू झालेल्या उपोषणाला पाठिंबाही दिला आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे ॲक्शन मोडवर

लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे ॲक्शन मोडवर आले आहेत. 13 जूनला राज ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांची ,नेत्यांची, विभाग प्रमुखांची आणि शहर प्रमुखांची महत्त्वाची बैठक घेणार आहेत. 13 जूनला राज ठाकरे यांच्या कार्यकारिणीची निवडणूक देखील होणार आहे.

सकाळी रंगशारदा येथे मनसे नेते, सरचिटणीस, लोकसभा संघटक, उपाध्यक्ष, राज्यसचिव, प्रवक्ते मुंबईतील महिला-पुरुष विभागअध्यक्ष, महिला-पुरुष जिल्हाअध्यक्ष, उपजिल्हाअध्यक्ष, तालुक़ा अध्यक्ष, शहरअध्यक्ष (महानगर पालिका क्षेत्र), उपशहर अध्यक्ष आणि सर्व अंगिकृत संघटनेच्या प्रमुख पदाधिका-यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.तसेच संध्याकाळी दादर माटुंगा कल्चरल हॉल येथे मनसेची निवडणूक होणार आहे.

अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात 7 मेंढ्या ठार तर 10 जखमी

अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात 7 मेंढ्या ठार तर 10 जखमी झाल्याची घटना कोल्हापूरातल्या कागल तालुक्यातील बामणी गावात घडली.Modi: आज मोदी मंत्रिमंडळाची पहिली बैठक

आज संध्याकाळी मोदी मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. मोदी मंत्रिमंडळाची संध्याकाळी ५ वाजता पहिली बैठक होणार आहे.

Pune News: फुरसुंगीमध्ये सकाळपासून  वाहतूक कोंडी

उड्डाण पुलावर ट्रक बंद पडल्याने फुरसुंगीकरांना सकाळपासूनच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.येथील वाहतूक कोंडीवर मार्ग काढावा अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत आज शिवसेनेची बैठक


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत आज शिवसेनेची बैठक होणार आहे. वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे.मंत्रिमंडळ विस्तार आणि  आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार असल्याची चर्चा आहे,

Pune News: पुण्यामध्ये वाहनांच्या तोडफोडीच सत्र सुरूच

पुण्यामध्ये वाहनांच्या तोडफोडीच सत्र सुरूच आहे. पुण्यातील हडपसर परिसरातील रामटेकडी परिसरात काल रात्री एकच्या सुमारास सात ते आठ मुलांच्या टोळीने कारची तोडफोड केली. ही घटना वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.

Maharashtra Politcs: पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार?

राज्यातील महायुती सरकारचा रडखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडणार असून पावसाळी अधिवेशनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पडेल अशी चर्चा आहे.

Farming : साडेआठ लाख शेतकऱ्यांना मिळणार सौर कृषी पंप

राज्याच्या सौर कृषी पंप योजनेंतर्गत डोंगराळ भागातील शेतकऱ्यांना पारेषणविरहित सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्याचा निर्णय महानिर्मितीने घेतला आहे. त्यानुसार पुढील काळात तब्बल साडेआठ लाख शेतकऱ्यांना हे पंप उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 

Meghalaya: मेघालयच्या पश्चिम टेकड्यांवर ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप

मेघालयच्या पश्चिम टेकड्यांवर ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार सोमवारी मेघालयच्या पश्चिम खासी हिल्स जिल्ह्यात 3.3 तीव्रतेचा भूकंप झाला,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.