MP Sanjay Raut sakal
महाराष्ट्र बातम्या

Threat Call: दिल्ली में मिल तुझे AK47 से उडा देंगे… ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी

शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेंस बिश्नोई यांच्या नावाने संजय राऊत यांना धमकी देण्यात आली आहे. शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पंजाबमधील खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारा व्यक्ती पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास करत आहेत.

दरम्यान यासंबधी बोलताना संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांची सुरक्षा हटवली आहे. तर गृहमंत्री या तक्रारीवरून आमची चेष्टा करतात असंही संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. तर राज्यात दंगली आणि दहशतवाद सुरू असल्याचंही संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. 

संजय राऊत यांना काल रात्री 9 वाजता एक त्यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज आला. त्यात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही धमकी आल्यानंतर संजय राऊत यांनी तात्काळ मुंबईचे पोलीस आयुक्त आणि विशेष आयुक्त यांना माहिती दिली आहे.

ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई केली. राऊत यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलं. तसेच मुंबई पोलिसांनी या प्रकरणी काही लोकांना ताब्यात घेतलं आहे. नेमके किती लोक आहेत, याची माहिती नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

मेसेजमध्ये काय लिहलं आहे?

हिंदू विरोधी. मार दूँगा तुझे. दिल्ली में मिल तू एके 47 से उडा दूँगा. मुसेवाला टाईप. लॉरेन्स के और से मेसेज है. सोच ले XX सलमान और तू फिक्स, अशी धमकी या टेक्स्ट मेसेजमधून देण्यात आली आहे. या मेसेज नंतर पोलिसांनी तात्काळ संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

Kaygaon News : शेतकरी पुत्राची गरुड भरारी, धनगरपट्टीच्या शुभम खैरेची नगरपरिषद अधिकारीपदी निवड

Pune Ganeshotsav : दोन वर्षांपासून सहभागी मंडळांनाच यंदा मिरवणुकीत प्रवेश; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

SCROLL FOR NEXT