५०० रुपयांत सिलेंडर, १०० युनिट मोफत वीज ; राजस्थानने करुन दाखवले, महाराष्ट्रात कधी?

Rajasthan
Rajasthan

देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महाराष्ट्रात गॅस सिलेंडरची किंमत गगनाला भिडली आहे. टोल दर, विज दरात देखील आजपासून वाढ होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थान सरकाने मोठा निर्णय घेतला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने केलेल्या घोषणांचा आजपासून सर्वसामान्यांच्या जनजीवनावर थेट परिणाम होणार आहेत.

महिलांच्या बसमधील प्रवासाचे निम्मे भाडे, 100 युनिट वीज बिल माफ, महिलांना 500 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर, धान्य विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी असे मोठे बदल आजपासून राजस्थानमध्ये झाले आहेत.

हेही वाचा - महिलांनो तरुणपणी घेतलेली जमीन उतारवयात होईल आधार

राजस्थानमध्ये सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार उज्ज्वला योजनेतील कुटुंबांना आजपासून ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर मिळणार आहे.रीफिलिंगसाठी दर महिन्याला फक्त ५०० रुपये भरावे लागतील,उर्वरित पैसे राज्य सरकार भरणार आहे.

Rajasthan
Ajit Pawar: पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य म्हणाले, 'घाईगर्दीत कोणाला पायात...'

तसेच यापूर्वी ५० युनिटपर्यंत वीज मोफत होती, मात्र अर्थसंकल्पात ती १०० युनिटपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही घोषणा आज १ एप्रिल २०२३ पासून लागू झाली आहे. महिलांसाठी आजपासून रोडवेज भाडे निम्मे करण्यात आले आहे. तसेच विशेष श्रेणीतील बसेसच्या भाड्यावर ३० टक्के सवलत देखील कायम राहील.

Rajasthan
LPG Price : आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी बातमी, LPG गॅस सिलेंडर झाला स्वस्त, किंमतीत मोठी घट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com