sakal exclusive
sakal exclusive sakal
महाराष्ट्र

दुष्काळाची तीव्रता वाढली! 1750 गावे अन्‌ 3000 वाड्या-वस्त्यांवर टॅंकर; भीमा खोऱ्यातील 26 धरणांमध्ये 55 TMC पाणी; आता शेतीला पाणी नाही, शहरांचा पाणीपुरवठा विस्कळीत

तात्या लांडगे

सोलापूर : भीमा खोऱ्यातील नगर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांमधील २६ धरणे आता तळ गाठत असल्याची स्थिती आहे. एप्रिलच्या सुरवातीलाच पुणे, नगर, सोलापूर, धाराशिव या शहर-जिल्ह्यांसाठी उजनी धरण महत्त्वाचे आहे, पण तेही आता उणे ३७ टक्के झाले आहे. तर भीमा खोऱ्यातील तब्बल २१ धरणे आताच निम्मी रिकामी झाली आहेत.

राज्यात गतवर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने जमिनीची पाणीपातळी देखील जवळपास एक मीटरने खोल गेल्याने अनेक गावांचे सार्वजनिक जलस्त्रोत बंद पडल्याची वस्तुस्थिती आहे. अनेक जलस्त्रोत आटत आले असल्याने गावांचा व शहरांचा पाणीपुरवठा आता विस्कळीत झाला आहे. सोलापूर शहराच्या निम्म्या भागाला पाच दिवसाड तर काही भागाला चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

पुणे जिल्ह्यातील स्थिती देखील अशीच होवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या दुष्काळात केवळ पाणीपुरवठ्याच्या टॅंकरवर १०० ते १५० कोटी खर्च करण्याची तरतूद शासनाने यापूर्वीच केली आहे. अनेक धरणांची पातळी खालावल्याने शेतीला पाणी सोडता येत नाही, अशी स्थिती आहे. दुसरीकडे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देताना नदी व धरण क्षेत्रातील वीजपुरवठा दोन ते पाच तासच करण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या काळातील दुष्काळाची तीव्रता नेमकी कोणत्या राजकीय पक्षाला झळ पोचवणार, यासंदर्भात तर्कवितर्क लढविले जात आहेत.

भीमा खोऱ्यातील धरणांची सद्य:स्थिती

उजनी (उणे ३७ टक्के), पिंपळगाव जोगे (०.९७ टीएमसी), माणिकडोह (०.५१ टीएमसी), येडगाव (०.८० टीएमसी), वडज (०.४० टीएमसी), डिंभे (४.४८ टीएमसी), घोड (१.२१ टीएमसी), विसापूर (०.१३ टीएमसी), चिल्हेवाडी (०.१७ टीएमसी), कळमोडी (१.४० टीएमसी), चासकमान (२.२९ टीएमसी), भामा आसखेड (२.९२ टीएमसी), वडिवळे (०.६४ टीएमसी), आंद्रा (१.५५ टीएमसी), पवना (३.७१ टीएमसी), कासारसाई (०.३० टीएमसी), मुळशी (८.३७ टीएमसी), टेमघर (०.३१ टीएमसी), वरसगाव (६ टीएमसी), पानशेत (४.३७ टीएमसी), खडकवासला (१.१० टीएमसी), गुंजवणी (१.४८ टीएमसी), नीरा देवघर (३.७२ टीएमसी), भाटघर (६ टीएमसी), वीर (४.४३ टीएमसी), नाझरे (०० टीएमसी).

जमिनीची पाणीपातळी खोलवर, टॅंकर सतराशेंवर

एप्रिलच्या सुरवातीलाच राज्यातील साडेतेराशे गावे, तीन हजार वाड्या-वस्त्यांवरील लोकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाची तीव्रता वाढत असतानाच जमिनीची पाणीपातळी एक मीटरने खोलवर गेल्याने दिवसेंदिवस टॅंकरची मागणी वाढू लागली आहे. सद्य:स्थितीत राज्यातील टॅंकरची संख्या १७००हून अधिक झाली आहे. नाशिक, नगर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, जालना, बीड, जळगाव या जिल्ह्यांमध्ये सध्या सर्वाधिक टॅंकर सुरु आहेत.

५ वर्षांच्या तुलनेत यंदा पाणीपातळी खोलवर

मागील दोन वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जमिनीची पाणीपातळी खोलवर गेली आहे. सोलापूर जिल्ह्यात यावर्षी मागील ५ वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक पाऊण मिटरपेक्षाही जास्त पाणीपातळी खोलवर गेल्याचे भूजल सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

- डॉ. मुश्ताक शेख, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT