Rain
Rain esakal
महाराष्ट्र

Untimely Rain : अर्ध्या महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी अर्ध्या महाराष्ट्राला हवामान खात्याने वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यात मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश असून, विदर्भातील चार जिल्ह्यांत गारपीट होईल, असेही हवामान खात्याने सोमवारी सांगितले.

पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्याच्या विविध भागांत ढगाळ हवामान होत आहे. ढगाळ हवामानामुळे राज्याच्या कमाल तापमानात काहीशी घट झाल्याचे दिसून आले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याला विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह विजांचा लखलखाट होऊन पाऊस पडेल, असा ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

त्यात धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांत काही ठिकाणी गारपीट होईल, यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

हवामानाची स्थिती

मराठवाडा आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीपासून रायलसीमा ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. विदर्भासह राज्यात ढगाळ आकाश होत आहे.

विदर्भात कमाल तापमान चाळिशीच्या खाली आले आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमान चाळिशीपार आहे. सोमवारी (ता. ८) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

किमान तापमानाचा पारा घसरला

राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा सरासरीच्या जवळ नोंदला जात आहे. राज्यात नाशिक येथे निचांकी किमान तापमान १७.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

राज्यातील तापमान

पुणे ३८.५, कोल्हापूर ३८.६, महाबळेश्वर ३२.७, मालेगाव ४१.८, नाशिक ३७.६, सातारा ३८.७, सोलापूर ४२, सांताक्रूझ ३३.३, डहाणू ३३.५, रत्नागिरी ३३.६, छत्रपती संभाजीनगर ३८.६, बीड ३९.६, परभणी ३८, अकोला ३८.९, अमरावती ३७.४, बुलडाणा ३७.५, ब्रह्मपुरी ३४.४, चंद्रपूर ३७, गोंदिया ३२.८, नागपूर ३४.८, वर्धा ३६.१, वाशीम ३८.४, यवतमाळ ३७.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT